Sara Tendulkar : सारा तेंडुलकर लवकरच चढणार बोहल्यावर! सुपरस्टारच्या लेकासोबत बांधणार लग्नगाठ? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Sara Tendulkar Marriage : सोशल मीडियावर सारा तेंडुलकरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

| Updated on: Nov 21, 2026 | 7:34 PM
1 / 5
क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सध्या सारा आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा राजवीर देओल यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सध्या सारा आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा राजवीर देओल यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

2 / 5

इतकंच नाही, तर दोघंही २०२७ मध्ये लग्न करणार असल्याचा दावा काही व्हायरल पोस्टमधून केला जात आहे. त्यामुळे सारा आणि राजवीर यांच्या कथित नात्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

3 / 5

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे या चर्चांना सुरुवात झाली. या पोस्टमध्ये राजवीर देओल सारा तेंडुलकरला महागड्या भेटवस्तू देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय साराची भावजय सानिया चंडोक हिच्या कथित कमेंटचाही या चर्चांशी संबंध जोडला जात आहे. या सर्व गोष्टींमुळे सारा आणि राजवीर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.

4 / 5

दरम्यान, सारा तेंडुलकर आणि राजवीर देओल यांच्या लग्नाबाबतही सोशल मीडियावर तर्कवितर्क लावले जात आहेत. २०२७ मध्ये दोघे लग्न करणार असल्याचं काही पोस्टमध्ये म्हटलं जात आहे.

5 / 5

सारा तेंडुलकर किंवा राजवीर देओल यांच्यापैकी कुणीही त्यांच्या नात्याबद्दल अथवा लग्नाच्या चर्चांबद्दल अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us