Shah Rukh Khan : शाहरूख खान 61 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना देणार मोठं सरप्राइझ; मन्नतवर लागली मोठी स्क्रिन

शाहरूख खानच्या वाढदिवसानिमित्त शाहरूखने चाहत्यांना खास सरप्राईझ देणार आहे. वाढदिवसाच्या आधीच मोठी तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. एवढी तयारी कशासाठी असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. तर याचं कारण आहे

Shah Rukh Khan : शाहरूख खान 61 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना देणार मोठं सरप्राइझ; मन्नतवर लागली मोठी स्क्रिन
shahrukh khan birthday
| Updated on: Nov 01, 2026 | 7:23 PM

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खानचा वाढदिवसं म्हटलं की चाहत्यांसाठी तो एखाद्या सणापेक्षा मोठा नसतो. दरवर्षी 2 नोव्हेंबरला शाहरूखच्या घराबाहेर म्हणजेच मन्नत बाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी जमते. यंदा मात्र त्याच्या घराबाहेर वाढदिवसाच्या आधीच मोठी तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. एवढी तयारी कशासाठी असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. तर याचं कारण आहे

शाहरूख खान 2 नोव्हेंबर 2026 रोजी आपला 61 वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त मुंबईच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर मोठी स्क्रिन लावण्याची तयारी करण्यात आली आहे. हा बंगला सुमारे 200 कोटींचा आहे असं बोललं जात आहे. तसेच या मोठ्या स्क्रिनवर किंग चित्रपटाशी संबंधित काही खास दाखवलं जाणार असल्याची चर्चा आहे.

Loading...

मध्यरात्री नेमकं काय रिलीज होणार?

किंग चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी सोशल मीडियावर सलग तीन दिवस मध्यरात्री पोस्ट केल्या. या पोस्टमधील शब्द एकत्र केल्यावर ‘इट्स टाईम फॉर द वर्ल्ड टू सेलिब्रेट’ असा मेसेज तयार झाला. त्यामुळे शाहरूखच्या वाढदिवसशी चित्रपटाचा टिझर किंवा गाणं प्रदर्शित होणार का ? याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

 

मात्र वैरायटी इंडियाच्या वृत्तानुसार, 2 नोव्हेंबरला किंग चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित होणार आहे. या गाण्याला अरिजित सिंहने आवाज दिला आहे. शाहरूखनेही याआधी चाहत्यांशी संवाद साधताना अरिजित गाण्यावर काम करत असल्याचं त्यानं सांगितलं होतं.दुसरीकडे, एड शीरन आणि अरिजित सिंह एकत्र गाणं गाणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

मुंबईत फक्त शाहरूखची हवा

शाहरूखच्या वाढदिवसाचा उत्साह केवल ‘मन्नत’ पुरता मर्यादित राहिलेला नाही. वांद्रे – वरळी सी लिंकवरही शाहरूखच्या सन्मानार्थ रोषणाई करण्यात आली आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

‘किंग’मध्ये कोणते कलाकार झळकणार

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’ हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यात शाहरूखसोबत त्याची मुलगी सुहाना खान, दीपिका पदुकोण,अभिषेक बच्चन, अनिल कपूर,राणी मुखर्जी, जयदीप अहवालत आणि राघव जुयल यांसारखे कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट 24 डिसेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us