AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Laxmikant Berde : माझं जहाज बुडालं, तिच्या आत्म्यानं…पहिल्या पत्नीच्या निधनानं हादरलेले लक्ष्मीकांत बेर्डे, भावुक होत व्यक्त केलेल्या भावना

Laxmikant Berde On Roohi Berde : लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एका जुन्या मुलाखतीत पहिली पत्नी रुही बेर्डे यांच्याबद्दल भाष्य केलेलं.

Laxmikant Berde : माझं जहाज बुडालं, तिच्या आत्म्यानं...पहिल्या पत्नीच्या निधनानं हादरलेले लक्ष्मीकांत बेर्डे, भावुक होत व्यक्त केलेल्या भावना
| Updated on: Nov 01, 2026 | 7:04 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या विनोदी अभिनयानं आणि टायमिंगनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूमधडाका’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यांच्या अभिनयाचे आजही लाखो चाहते आहेत. मात्र, पडद्यावर प्रेक्षकांना हसवणाऱ्या या अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढ-उतार आले. त्यापैकी सर्वांत वेदनादायी प्रसंग म्हणजे त्यांच्या पहिल्या पत्नी अभिनेत्री रुही बेर्डे यांचं अकाली निधन. त्यांच्या जाण्यानं लक्ष्मीकांत बेर्डे यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. एका जुन्या मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी पहिल्या पत्नीबद्दल भाष्य केलेलं.

कोण होत्या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नी रुही बेर्डे?

रुही बेर्डे या मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. लक्ष्मीकांत बेर्डे आणि रुही यांची ओळख नाटकाच्या माध्यमातून झाली. एकत्र काम करत असताना त्यांच्यात मैत्री निर्माण झाली आणि पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं. १९८५ मध्ये दोघांनी लग्न केलं. त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे यांची कारकीर्द हळूहळू बहरत होती, तर रुही बेर्डे यांचाही अभिनय क्षेत्रात चांगला जम बसला होता. लग्नानंतर मात्र रुही यांनी घराची जबाबदारी सांभाळण्याला प्राधान्य दिलं. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या करिअरला स्थैर्य मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं.

पत्नीच्या निधनानं लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

लक्ष्मीकांत बेर्डे आणि रुही बेर्डे यांचा संसार जवळपास १५ वर्षे टिकला. या काळात रुही यांनी आपल्या पतीला प्रत्येक टप्प्यावर साथ दिली. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ५ एप्रिल १९९८ रोजी रुही बेर्डे यांचं निधन झालं. वृत्तांनुसार, ब्रेन हॅमरेजमुळे त्यांची प्रकृती खालावली होती. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. ‘दूरदर्शन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये लक्ष्मीकांत यांनी पहिल्या पत्नीबद्दल भाष्य केलेलं. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाले होते की, ‘जेव्हा मी काही वाचतो स्टेजवर कॅमेरासमोर तर फार प्रॉब्लेम्स असतात आणि हे प्रॉब्लेम्स मला कधी जाणवून नाही दिले. गेली १५ वर्षे हे दोन आई-वडिलांचे जे प्रसंग माझ्यासोबत घडले, तर ती १५ वर्षे ज्या बाईनं मला जाणवून नाही दिली. सतत स्वतः हसत राहिली, मला हसत ठेवलं, अशी माझी बायको होती. ती गेली तेव्हा, मात्र मला माझं जहाज बुडाल्यासारखं झालं. मी थोडा हललो. पण, शेवटी काय म्हणा, तिच्या आत्म्यानं मला सांगितलं, काम कर परत जोमाने. तिची इच्छा होती.’

‘एक गोष्ट तिची होती की, १५ वर्षांपूर्वी मी कोणच नव्हतो, त्यावेळी तिच्याकडे मुलाखत घ्यायला लोक यायचे. तर ती सांगायची की, जरा ह्याची पण मुलाखत घ्या, हा पण मुलगा उद्याचा स्टार आहे. एवढं मात्र नक्की होतं की, माझ्यातले उद्याचे गुण तिलाच फक्त माहित होते आणि ती जाणून होती. पण, एवढा प्रवास केला असताना मध्येच असं तिनं उठून जायला नको होतं.’ असं लक्ष्मीकांत यांनी शेवटी म्हटलेलं.

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती