AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुखने सर्वांसमोरच केले काजोलला किस, रोहित शेट्टीने पाहिलं अन्…, तो व्हिडीओ चर्चेत

अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये किंग खान सर्वांसमोर काजोल हिला किस करतो.

शाहरुखने सर्वांसमोरच केले काजोलला किस, रोहित शेट्टीने पाहिलं अन्..., तो व्हिडीओ चर्चेत
| Updated on: Sep 24, 2026 | 1:00 PM
Share

Shah Rukh Khan – Kajol : अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांंमध्ये एकत्र स्क्रिन शेअर करत दोघांनी चाहत्यांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. दोघांचे अनेक सिनेमे आजही चाहते तितक्याच आवडीने पाहतात. त्यांच्या सिनेमांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील शाहरुख आणि  काजोल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सिनेमाची शुटिंग सुरु असताना काजोल हिचं लक्ष नसताना शहरुख किस करतो.  ते बघून रोहित शेट्टी देखील हसू लागतो. व्हिडीओ अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडीओबद्दल सांगायचं झालं तर, ‘दिलवाले’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. srkian2002 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तर कॅप्शनमध्ये सिनेमाबद्दल लिहिल आहे.’दिलवाले’ हा प्रेम, कुटुंब, विरह आणि आयुष्यात मिळणाऱ्या दुसऱ्या संधीवर आधारित एक रोमँटिक ॲक्शन-ड्रामा सिनेमा आहे. राज आणि मीरा एकमेकांच्या प्रेमात पडतात, परंतु कौटुंबिक वैमनस्यामुळे ते दुरावतात. अनेक वर्षांनंतर, जेव्हा त्यांची लहान भावंडे एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेव्हा नशिब त्यांना पुन्हा एकत्र आणते आणि भूतकाळातील घटना पुन्हा एकदा समोर येतात.

‘दिलवाले’ या  सिनेमात शाहरुख खान आणि काजोल यांच्यासोबत अभिनेत्री कृती सेनॉन आणि अभिनेता वरुण धवन यांनी मुख्य भूमिका साकारलेली. तर सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्यावर होती. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी करु शकला नाही. पण  सिनेमातील गाणी हीट ठरली.

आता शाहरुख खान याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, किंग खान लवकरच ‘किंग’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ज्यामध्ये अभिनेता पहिल्यादा लेक सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. किंग खान याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.

काजोल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आता बॉलिवूडपासून दूर आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Follow Us
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस