AskSRK | थेट चाहत्यावर भडकला शाहरुख खान, किंग खानचा पारा चढला, थेट म्हणाला, सोशल मीडियावरील वाईट

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा सध्या तूफान चर्चेत आहे. शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्येही मोठा उत्साह हा बघायला मिळतोय. कारण शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट लवकरच रिलीज होतोय.

AskSRK | थेट चाहत्यावर भडकला शाहरुख खान, किंग खानचा पारा चढला, थेट म्हणाला, सोशल मीडियावरील वाईट
| Updated on: Sep 03, 2023 | 10:38 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण हे बघायला मिळतंय. कारण शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट (Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शाहरुख खान हा देखील सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतोय. शाहरुख खान याचे चित्रपट मोठा धमाका करताना देखील दिसत आहेत. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे पठाणने मोठा धमाका केला.

शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय. शाहरुख खान हा पठाण चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला. शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या संपर्कात सोशल मीडियाच्या माध्यमातून होता. विशेष म्हणजे आता त्याचप्रकारे जवान चित्रपटाचे प्रमोशन देखील शाहरुख खान करत आहे.

नुकताच आज रविवारी शाहरुख खान याने आपल्या चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन केले. या सेशनमध्ये शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला. यावेळी एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नामुळे चांगलाच शाहरुख खान हा भडकलेला दिसला. शाहरुख खान याने त्या चाहत्याला खडेबोल सुनावले.

एका चाहत्याने शाहरुख खान याला विचारले की, #जवानचे बुकिंग किती सहयोग आहे आणि किती खरे आहे? चाहत्याचा हा प्रश्न वाचताच शाहरुख खान याचा पारा चढला. यावर उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला की, सोशल मीडियावरील अशा वाईट (घटिया) गोष्टी नको यार… सकारात्मक विचार आणि चांगल्या भावना ठेवा. आयुष्यासाठी चांगले.

आता शाहरुख खान याच्या उत्तराची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. शाहरुख खान हा जवान चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त दिसतोय. शाहरुख खान हा गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये देखील पोहचला. यामुळे हे स्पष्ट झाले की, आता सनी देओल आणि शाहरुख खान यांच्यामधील वाद मिटला आहे. शाहरुख खान हा दुबईमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us