AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या नेटवर्थमध्ये घट, पण बादशाहत कायम ! अमिताभ-सलमानला मागे टाकत ठरला भारताचा सर्वात श्रीमंत अभिनेता

बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींच्या हुरुन इंडिया रिच लिस्ट 2026 मध्ये शाहरुख खानने पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत त्याच्या संपत्तीत घट झाली असली तरी, तो भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता ठरला आहे.

Shah Rukh Khan :  शाहरुख खानच्या नेटवर्थमध्ये घट, पण बादशाहत कायम ! अमिताभ-सलमानला मागे टाकत ठरला भारताचा सर्वात श्रीमंत अभिनेता
Shah Rukh Khan
| Updated on: Sep 23, 2026 | 10:05 PM
Share

बॉलिवूडमधील स्टार्स फक्त चित्रपटांद्वारेच नव्हे तर जाहिराती आणि साईड बिझनेस, गुंतवणुकीद्वारेही खूप कमाई करतात. आता हुरुन इंडिया रिच 2026 च्या सर्वात श्रीमंतर सेलिब्रिटींची लिस्ट जाहीर झाली आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) यंदाही या लिस्टमध्ये अव्वल असून त्याने पहिला क्रमांक कायम राखला आहे. शाहरुख हा भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता बनला आहे. त्याने अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनाही मागे टाकलंय. मात्र त्याच्या नेटवर्थमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडी घट झाली आहे. असं असलं तरी तो सर्वात श्रीमंत अभिनेता ठरल्याने त्याच्या चाहत्यांच्या आनंदात मात्र भरपूर वाढ झाली आहे.

शाहरुखचं नेटवर्थ

हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये यावेळी शाहरुख खानची संपत्ती 10 हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आलं आहे. चित्रपटांव्यतिरिक्त बिझनेस, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि नाईट रायडर्स स्पोर्ट्सचाही समावेश आहे. 2026 या वर्षात त्याची संपत्ती 10 हजार 800 कोटी रुपये आहे. मात्र गेल्या वर्षी त्याची संपत्ती थोडी जास्त होती, त्यावेळी शाहरुखकडे 12 हजार 490 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं होतं. म्हणजेच, 2025 च्या तुलनेत आता 2026 मध्ये शाहरुख खानची संपत्ती 2,490 कोटी रुपयांनी घटली आहे.

अमिताभ बच्चन , सलमानचा नंबर कितवा ?

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर  बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे आहेत, त्यांचं नेटवर्थ 4 हजार कोटी रुपये आहे. तर सलमान खान 3 हजार कोटी रुपयांच्या नेटवर्थसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2500 कोटी रुपयांच्या नेटवर्थसह हृतिक रोशन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, यावर्षीच्या यादीत सलमान खानचा समावेश झाला आहे.  गेल्या वर्षी तो या यादीत नव्हता. हृतिक रोशनच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी त्याचं नेटवर्थ 2160 कोटी होतं, आता ते वाढून 2500 कोटी इतकं झालंय. HRX या त्याच्या ब्रँडमुळे त्याला फायदा झाल्याचं म्हटलं जातंय.

जूही चावला, करण जोहर लिस्टमधून बाहेर

दरम्यान, गेल्या वर्षी जुही चावला आणि करण जोहर यांच्या नावाचा या यादीत समावेश होता, पण मात्र यावर्षी ते या यादीत नाहीत. गेल्या वर्षी जुही चावलाची संपत्ती 7790 कोटी रुपये होती, तर करण जोहरचे नेटवर्थ 1880 कोटी रुपये होतं.

बॉलिवूड स्टार्सव्यतिरिक्त ‘रामायण’ चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांचे वडील नरेश मल्होत्रा यांचाही या यादीत समावेश झाला आहे. त्यांची नेटवर्थ16 हजार कोटी रुपये आहे.

शाहरुखचे चित्रपट

शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 2023 साली डंकी हा त्याचा चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर तो अजून मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. या वर्षाअखेरीस ‘किंग’ चित्रपटामधून तो मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार असून या पिक्चरमध्ये त्याची मुलगी सुहाना खानही झळकणार आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी