AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan : शाहरुख खानला मोठं टेन्शन… KKRच्या वादात अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षाची उडी; थेट पत्रच…

Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खान याने बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला याला केकेआर टीममध्ये खेळण्याची संधी दिली आहे. म्हणूनच अनेकांनी किंग खानवर निशाणा साधला आहे. तर अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी थेट अभिनेत्याला पत्र लिहिलं आहे.

Shah Rukh Khan : शाहरुख खानला मोठं टेन्शन... KKRच्या वादात अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षाची उडी; थेट पत्रच...
अभिनेता शाहरुख खान
| Updated on: Jan 02, 2026 | 1:29 PM
Share

KKR : अभिनेता शाहरुख खान वर्षाच्या सुरुवातीलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका निर्णयामुळे किंग खान याच्यावर टीका होत आहे. शाहरुख खान याने केकेआर टीमसाठी बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला घेतल्याबद्दल वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेशात सतत हिंदूंवर अन्याय आहे तर, दुसरीकडे शाहरुख खान याने त्याच्या टीममध्ये बांगलादेशी क्रिकेटपटूला संधी दिली आह. याच निर्णयामुळे अडचणी आलेल्य शाहरुख खान विरोधात लोकांमधील संताप वाढताना दिसतोय.

दरम्यान, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी शाहरुख खान याला थेट पत्रच लिहिलं आहे. पत्रातून प्यारे खान यांनी केकेआरमधून बांगलादेशी खेळाडूंना दूर ठेवण्याचं शाहरुख खान याला आवाहन केलं आहे. शिवाय अभिनेता अल्पसंख्याक असल्यामुळे देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

प्यारे खान पत्रात म्हणाले, शाहरुख खान भारतात अल्पसंख्याक आहे, त्यामुळे त्यांची सुरक्षा आमची जबाबदारी आहे. इथे काही झालं तर त्यांची सुरक्षा आमची जबाबदारी आहे… अभिनेता शाहरुख खान याला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघातून बांगलादेशी क्रिकेटपटूंना दूर ठेवण्याचं आवाहन केलं..

प्यारे खान पुढे म्हणाले, ‘मी शाहरुख खान याला आवाहन करतो की या बांगलादेशी खेळाडूंवर पूर्णतः बंदी घालावी. ज्या देशात अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत, तो देश कधीच प्रगती करू शकत नाही. तिथल्या अल्पसंख्याक समुदायाची, आपल्या हिंदू बांधवांची जबाबदारीही आपलीच आहे.” सध्या शाहरुख खान त्याच्या निर्णयामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

सांगायचं झालं तर, केकेआर संघाने आयपीएल 2026 च्या लिलावात बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रहमान याला 9.2 कोटी रुपयांना खरेदी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यावर शाहरुख खान याने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

किंग खान याच्या या निर्णयानंतर अभिनेत्याला टीकेचा सामना करावा लागता आहे. बांगलादेशात हिंदूंची हत्या होत असताना आयपीएल लिलावात तिथल्या खेळाडूंना खरेदी केलं जातंय, अशा शब्दांत शाहरुखवर नाराजी व्यक्त केली जात आहे. शाहरुखला भारतात राहण्याचाही अधिकार नाही, अशी टीका त्याच्यावर होत आहे. जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य, बाबा बागेश्वर, देवकी नंदन या धार्मिक व्यक्तींनीही शाहरुख खानच्या निर्णयाचा विरोध केला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...