Mukesh Khanna: बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल मुकेश खन्नांचं मोठं विधान

"काहीही बोलण्याआधी.."; मुकेश खन्ना यांचा बॉलिवूड सेलिब्रिटींना मोलाचा सल्ला

Mukesh Khanna: बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल मुकेश खन्नांचं मोठं विधान
Mukesh Khanna
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 20, 2022 | 2:11 PM

‘शक्तीमान’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) हे सध्या चित्रपटांपासून दूर आहेत. असं असलं तरी ते त्यांच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत येतात. मुकेश यांचं एक युट्यूब चॅनल आहे. त्यावर ते व्हिडीओ पोस्ट करत आपले विचार मांडत असतात. मात्र त्यांच्या या विचारांवरून अनेकदा ते नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येतात. नुकतंच त्यांनी बॉलिवूड स्टार्सच्या (Bollywood Stars) वागणुकीबद्दल खुलेपणानं भाष्य केलं आहे. त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर असलेल्या या व्हिडिओमध्ये ते बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल बोलताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये मुकेश म्हणतात, “सेलिब्रिटींनी थोडं विचार करूनच बोलावं. सोशल मीडियामुळे कलाकार आणि सर्वसामान्यांमधील अंतर कमी झालं आहे. यामुळेच अनेकदा आपलं वक्तव्य लोकांना आवडलं नाही तर त्यांच्या रागाचा सामना करावा लागतो.”

फिल्म स्टार्सच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना मुकेश सांगतात की, “एक काळ असा होता जेव्हा लोकांना त्यांच्या आवडत्या स्टार्सबद्दल फक्त मॅगझिन किंवा मुलाखतीतूनच कळायचं. पण आता हे स्टार्स सोशल मीडियामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्याचा एक भाग बनले आहेत.”

“कलाकारांनी बेजबाबदार विधानं करू नयेत. कारण ते थेट लोकांशी संबंधित असतात. त्यांनी काहीही बोलण्यापूर्वी नीट विचार केला पाहिजे. कारण लाखो लोक त्यांना सोशल मीडियावर फॉलो करतात. सेलिब्रिटींचं एक विधान मोठ्या संख्येने लोकांवर परिणाम करू शकतं,” असा सल्ला त्यांनी सेलिब्रिटींना दिला.

मुकेश खन्ना हे शक्तिमान या मालिकेमुळे रातोरात स्टार बनले. या मालिकेनंतर त्यांची देशभरात ओळख झाली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शक्तिमान या मालिकेवर लवकरच बिग बजेट चित्रपट बनणार असल्याचा खुलासा केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.