
बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकणारा कपूर परिवार आजकाल सतत चर्चेत असतो. अशा परिस्थितीत आता रणबीर कपूर आणि करिना कपूरची चुलत बहीणचे फोटो समोर आले आहेत. रणबीर-करीनाच्या या चुलत बहिणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

करीना-रणबीरच्या या चुलत बहिणीचे नाव आहे आलिया कपूर आहे. मुंबईत नव्हे, तर आलिया लहानपणापासूनच लंडनमध्ये राहत आहे. आलिया कपूर ही दिवंगत अभिनेता शशी कपूर यांची नात आहे.

आलिया शशी कपूर यांचा मुलगा करण कपूर यांची मुलगी आहे. करणने फोटोग्राफीचा अभ्यास केला असून, त्यांनी देखील बॉलिवूडमध्येही आपले नशीब आजमावले होते. करणने 1978मध्ये ब्रिटीश मॉडेल लोरना टार्लिंगशी लग्न केले होते. पण त्यानंतर ही जोडी 1993मध्ये विभक्त झाली.

करण आणि लोरना यांना जॅक कपूर नावाचा एक मुलगा देखील आहे. आलिया कपूर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती बर्याचदा आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

जरी आलिया लंडनमध्ये लहानाची मोठी झाली असली, तरी तिचे कपूर कुटुंबियांशीचे खूप चांगले संबंध आहेत.

असे सांगितले जाते की, ती तैमूर अली खानच्या पहिल्या वाढदिवशीसुद्धा भारतात आली होती.