Dawood Ibrahim : ISI पेक्षा दाऊद मोठा नाही…‘धुरंधर’मध्ये अंडरवर्ल्ड डॉनचं चुकीचं चित्रण, प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तीचा दावा

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमबद्दल ज्येष्ठ पत्रकारानं धक्कादायक दावा केला असून 'धुरंधर' मध्ये दाऊदचं चित्रण चुकीचं केलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Dawood Ibrahim : ISI पेक्षा दाऊद मोठा नाही...‘धुरंधर’मध्ये अंडरवर्ल्ड डॉनचं चुकीचं चित्रण, प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तीचा दावा
| Updated on: Nov 27, 2026 | 4:52 PM

बॉलिवूड दिग्दर्शक आदित्य धर यांचा ‘धुरंधर’ सिनेमाची चर्चा होते. या चित्रपटातील कथानक, कलाकारांचे लूक आणि पाकिस्तानमधील अंडरवर्ल्डशी संबंधित घटनांमुळे सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच ज्येष्ठ पत्रकार शिला भट्ट यांनी या चित्रपटाबद्दल काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. विशेष म्हणजे, दाऊद इब्राहिमच्या भूमिकेसाठी वापरण्यात आलेल्या फोटोशी त्यांचा संबंध असल्याचं त्यांनी सांगितलं.

टीआरपी क्लिप्सला दिलेल्या मुलाखतीत शिला भट्ट यांनी सांगितलं की, आदित्य धर यांच्या कार्यालयातून त्यांना फोन आला होता. त्यांना दाऊद इब्राहिमचा फोटो हवा होता. या फोटोसाठी त्यांनी दोन लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, शिला भट्ट यांनी पैसे घेण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या, ‘इतक्या वर्षांत मी दाऊदच्या फोटोवरून कधी पैसे कमावले नाहीत. त्यामुळे त्याचे पैसे घेण्याऐवजी त्यांनी तो फोटो वापरावा, असं आम्ही ठरवलं. मात्र, त्यांनी त्या फोटोचे राइट्स घेतले. दाऊदची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा तशाच प्रकारचा फोटो काढण्यात आला आणि मला त्याचं क्रेडिटही देण्यात आलं.’

Loading...

‘धुरंधर’मधील दाऊदच्या व्यक्तिरेखेवर उपस्थित केले प्रश्न

शिला भट्ट यांनी ‘धुरंधर’ सिनेमा पाहिल्याचंही सांगितलं. मात्र, चित्रपटातील कथा काल्पनिक असल्याचं त्या म्हणाल्या. सिनेमात घडणाऱ्या घटना पाहून अनेकांना त्या सत्य असल्याचा भास होतो, असंही त्यांनी नमूद केलं. आदित्य धर यांनी चित्रपटाची मांडणी उत्तम केली असली, तरी दाऊद इब्राहिमचं चित्रण वास्तवाशी जुळणारं नसल्याचं त्यांचं मत आहे.

याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ‘मी दाऊदला प्रत्यक्ष पाहिलं आहे. तीन दिवस मी दुबईत राहून त्याची मुलाखत घेतली होती. त्यामुळे चित्रपटात दाखवलेला दाऊद प्रत्यक्षात तसा नव्हता, हे मी सांगू शकते. इतक्या वर्षांत एखाद्या व्यक्तीची देहबोली इतकी बदलत नाही. दाऊदची बॉडी लँग्वेज चित्रपटात दाखवल्याप्रमाणे नव्हती.’

‘आयएसआयपेक्षा दाऊद मोठा नाही’

चित्रपटातील दाऊद इब्राहिमचं स्थान आणि त्याचा प्रभाव दाखवण्याच्या पद्धतीवरही शिला भट्ट यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या मते, दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयपेक्षा मोठा नाही. मात्र, चित्रपटात त्याला ज्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे, ते वास्तवापेक्षा वेगळं आहे. त्यामुळे आदित्य धर यांनी चित्रपटात दाखवलेल्या काही गोष्टी चुकीच्या असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us