AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावच्या रहिवाशांचे गुजरातच्या नाल्यात मृतदेह, घटनेला वेगळे वळण, विम्याच्या रकमेसाठी हत्येचा संशय…

जळगावच्या मजूर कुटुंबाला गुजरात येथे कालव्यात फेकून दिल्याच्या घटनेला नवी कलाटणी मिळाली आहे. अपघाताचा बनाव रचून विमा कंपन्यांची रक्कम हडपण्याचा अँगल या घटनेला आहे.

जळगावच्या रहिवाशांचे गुजरातच्या नाल्यात मृतदेह, घटनेला वेगळे वळण, विम्याच्या रकमेसाठी हत्येचा संशय...
crime news jalgoan
| Updated on: Nov 27, 2026 | 4:50 PM
Share

गुजरात येथील कालव्यात जळगावातील एकाच कुटुंबातील सहा जणांना फेकून दिल्याच्या खळबळजनक घटनेमध्ये पाच जणांचे मृतदेह हाती लागले आहे. या पाचही जणांची हत्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या घटनेत कुटुंबातील एक मुलगा हा बचावाला असून तो सुखरुप असून त्याच्यामुळेच ही घटना उघड झाली आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्ता अपघाताचा खोटा बनाव रचून, बनावट साक्षीदार उभे करत विमा कंपनीला ५० लाख रुपयांना लुबाडण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी १९ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात तपासी अंमलदारासह चार पोलीस कर्मचारी, एक वैद्यकीय अधिकारी आणि खासगी व्यक्ती अशा एकूण १० जणांचा समावेश आहे. नितेश पाटील आणि कविता संजय पाटील ( रा. एरंडोल) यांचीही नावे संशयित आरोपी म्हणून समोर आली आहेत.

नितीन पाटील , कविता पाटील, श्रुती पाटील (वय ९ वर्षे ), प्रथमेश पाटील (वय ३ वर्षे )आणि हरीश पाटील (वय १५ वर्षे )अशी मृत कुटूबियांची नावे आहेत. याप्रकरणी एकाच कुटुंबातील पाचही जणांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले असून बारडोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक केली आहे. जळगावच्या मेहुणबारे पोलिस ठाण्यात दाखल ५० लाखांच्या विमा हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याशी या गुजरात येथील हत्याकांडाचे धागेदोरे असल्याचे समोर आले आहेत.

अपघाताचा बनाव करून ५० लाखाचा विमा हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून सात जण अटकेत असून कोठडीत आहेत. मयत नितीन आणि कविता हे दोन्ही मेहुणबारे पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात संशयित आरोपी असून याच अनुषंगाने त्यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विमा कंपन्यांशी फसवणूक करून मिळालेली १० लाखांची रक्कम मयत कविता हिच्याकडे होती, त्यातून हे हत्याकांड झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

गुजरात येथील हत्याकांडाच्या घटनेत मेहुणबारे पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील सात आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून हत्याकांडातील आरोपींची संख्या एकूण ८ झाली आहे, अद्याप तीन आरोपी फरार आहेत. गुजरात हत्याकांडाच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये एक डॉक्टर, चार पोलिस , विमा एजंट आणि इतरांचा समावेश आहे. चांगलं काम मिळवून देतो असे सांगून आरोपींनी जळगावच्या पाटील कुटुंबाला गुजरातमध्ये बोलावून त्यांची हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

जळगावच्या मजूर कुटुंबाला गुजरात येथे कालव्यात फेकून दिल्याच्या घटनेला नवी कलाटणी मिळाली आहे. पोलिसांच्या तपासात घटनेतील आरोपींच्या टोळीने अनेक घटनांमध्ये अपघाताचा बनाव करून विमा कंपन्यांची फसवणूक केल्याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Follow Us
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया