AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi India Alliance Meeting: राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी! इंडिया आघाडीच्या बैठकीला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, कारण…

केंद्र सरकारने दिल्लीमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्यानंतर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. या अधिवेशनात महिला आरक्षण तसेच मतदारसंघ पुर्नरचना विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीनेही तातडीची बैठक बोलावली आहे.

Delhi India Alliance Meeting: राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी! इंडिया आघाडीच्या बैठकीला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत, कारण...
Supriya Sule
| Updated on: Nov 27, 2026 | 4:38 PM
Share

 India Aaghadi Meeting:  राजधानी दिल्लीमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. दिल्लीमध्ये 30 नोव्हेंबर रोजी लोकसभेचे तर 3 डिसेंबर रोजी राज्यसभेचे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्या इंडिया आघाडीनेही तातडीची बैठक बोलावली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या बैठकीला जाणार नसल्याचे समोर आले आहे.

दिल्लीत इंडियाची बैठक, सुप्रिया सुळे गैरहजर राहणार… 

केंद्र सरकारने दिल्लीमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्यानंतर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. या अधिवेशनात महिला आरक्षण तसेच मतदारसंघ पुर्नरचना विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीनेही तातडीची बैठक बोलावली आहे.

इंडिया आघाडीतील घटक पक्षांची भूमिका या बैठकीमध्ये ठरणार आहे. मात्र या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार आजारी असल्याने सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत असं सांगण्यात आले असून पक्षाच्या वतीने इतर खासदर उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. संजय राऊत यांनी स्वतःच याबाबतची माहिती दिली आहे. मात्र पक्षाच्या वतीने इतर खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

डिलिमिटेशनबाबत भाजप शरद पवारांच्या संपर्कात…

दुसरीकडे, संसदेत डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने बहुमताची जुळवाजुळव सुरु केली आहे. याबाबतच सर्वात मोठी अपडेट म्हणजे डिलिमिटेशन बिलसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधला जत असल्याची सूत्रांची माहिती आहे. डिलिमिटेशन बिल मांडताना आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचाही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे.

Follow Us
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया