कोल्हापूरच्या राजघराण्याचा जावई होणे झहीर खान याच्यासाठी नव्हते सोपे, सागरिकाने पहिल्यांदाच सांगितलं सर्वकाही, माझ्या वडिलांनी..
अभिनेत्री सागरिका घाटगे आणि झहीर खान यांची लव्ह स्टोरी अत्यंत खास आहे. त्यातच पहिल्यांदा सागरिका हिने त्यांच्या लव्ह स्टोरीवर मोठे विधान केले. झहीर खान याच्याबद्दल घरी सांगितल्यानंतर घरच्यांचे काय म्हणणे होते, हे सागरिकाने सांगितले.

बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे हिने आपल्या खासगी आयुष्याबद्दल पहिल्यांदाच मोठा खुलासा केला. झहीर खान याला डेट केल्यानंतर अभिनेत्रीने त्याच्यासोबत लग्न केले. मात्र, अनेक वर्ष त्यांनी आपले नाते सर्वांपासून लपून ठेवले. कोल्हापूरच्या राजघराण्याच्या जावई होणे झहीर खान याच्याकरिता सोप्पे नव्हते. झहीर आणि सागरिका यांची लव्ह स्टोरी अत्यंत खास आहे. नुकताच सागरिका घाटगे हिने सानिया मिर्झाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सागरिका हिने सांगितले की, झहीर आणि तिची पहिली भेट एका मित्राच्या पार्टीत झाली. सुरूवातीला त्यांच्यात मैत्री झाली. त्यानतंर भेटीगाठी वाढल्या. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, अनेक वर्ष त्यांनी आपले नाते सर्वांपासून लपून ठेवले. त्यांनी 23 नोव्हेंबर रोजी कोर्ट मॅरेज केले आणि मुंबईत दणक्यात रिसेप्शन ठेवले.
पण नक्कीच हा प्रवास इतका सोप्पा नव्हता. सागरिका घाटग कोल्हापूर घराण्याची लेक आहे. आजोबा, वडील राजघराण्यातील आहेत. झहीरबद्दल तिने ज्यावेळी आपल्या घरी पहिल्यांदा सांगितले ज्यावेळी घरच्यांची प्रतिक्रिया सर्वसामान्य घरातील कुटुंबियांसारखीच होती पण त्यांनी लेकीसाठी सर्व गोष्टी मान्य केल्या.
माझ्या वडिलांनी सर्वात अगोदर झहीरची पूर्ण माहिती काढली. माझ्या वडिलांनी झहीर खान याच्याबद्दल विचारण्यासाठी आणि माहिती काढण्यासाठी त्याच्या ट्रेनरला फोन केला. झहीर माझ्या वडिलांना पहिल्यांदा भेटला त्यावेळी त्यांनी थेट त्याला एक मोठी यादीच देऊन टाकली. त्या यादीत कसे वागायचे, काय करायचे काय नाही हे सर्व होते. जहीर खान याने म्हटले की, माझ्या पाठीमागे हिच्या वडिलांनी चाैकशी केल्याचे मला उशीरा समजले.
अंशुमन गायकवाड यांनी तर मला सरळ मेसेज केला होता, त्यांनी विचारले होते की, तू माझ्या भीचीबद्दल किती सीरियस आहेस? मी ऐकले आहे की, तू तिच्या खूप जास्त जवळ आहे. सागरिका म्हणाली की, त्यानंतर माझ्या वडिलांमध्ये आणि झहीरमध्ये खूप जास्त चांगली मैत्री झाली. झहीर आहेच तसा एकदा त्याला कोणी बोलले की, तो त्याला त्याचे करून टाकतो. झहीर खानबद्दल पहिल्यांदाच सागरिकाने हा मोठा खुलासा केला.
