AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena UBT On Delimitation Bill: इंडिया आघाडीच्या बैठकीआधी मोठा ट्वीस्ट! ठाकरे गटाचे राष्ट्रवादीच्या पावलावर पाऊल, विधेयकावर थेट भूमिका

फक्त ५० टक्के जागा वाढणार एवढ्यापुरते ते मर्यादीत नाही. सुप्रीम कोर्टात सध्या आमची केस सुरु आहे. एका शब्दावरुन या केसमध्ये किती ट्वीस्ट येतो हे तुम्ही पाहत आहात.  तसेच हे बील आणतील तेव्हा एक शब्दही महत्त्वाचा असेल त्या एका शब्दाचा मोठा अर्थ असेल," असं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. 

Shivsena UBT On Delimitation Bill: इंडिया आघाडीच्या बैठकीआधी मोठा ट्वीस्ट! ठाकरे गटाचे राष्ट्रवादीच्या पावलावर पाऊल, विधेयकावर थेट भूमिका
Uddhav Thackeray
| Updated on: Nov 27, 2026 | 4:32 PM
Share

Shivsena UBT On Delimitation Bill:  केंद्र सरकारने दिल्लीमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे.  या विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन तसेच महिला आरक्षण विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकाला इंडिया आघाडीकडून विरोध होत असतानाच राष्ट्रवादीने मात्र बिल हातात आल्यानंतर निर्णय घेतला जाईल अशी भूमिका मांडली आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनीही राष्ट्रवादीच्याच पाऊलावर पाऊल ठेवत या विधेयकाबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अरविंद सावंत? 

“बिलाचे प्रारुप आम्हाला मिळाले नाही. प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली नाही. बिलामध्ये 50 जागा वाढवणार असे कुठेही वाक्य नव्हते. याऊलट लोकसंख्येला अनुसरुन केले जाईल, असं या बिलामध्ये म्हटले होते. पण फक्त ५० टक्के जागा वाढणार एवढ्यापुरते ते मर्यादीत नाही. सुप्रीम कोर्टात सध्या आमची केस सुरु आहे. एका शब्दावरुन या केसमध्ये किती ट्वीस्ट येतो हे तुम्ही पाहत आहात.  तसेच हे बील आणतील तेव्हा एक शब्दही महत्त्वाचा असेल त्या एका शब्दाचा मोठा अर्थ असेल,” असं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

तसेच “हे बील वाचल्याशिवाय यावर कोणतीही भूमिका घेणार नाही. मुळात आरक्षणाचे बील आधीच मंजूर झाले आहे. आत्ता त्याची अंमलबजावणी कशी करायची तर ती आजच्या संख्येनुसारही करता येईल. पण त्यासोबत परिसिमन कसे करणार? हे कोण ठरवणार? निवडणूक आयोगाची विश्वासहार्ता नाही. कोणता भाग आपल्या पक्षाला फायद्याचा नाही तो पाहून तो वगळा असंही या बिलामध्ये केले जाईल,”  असा धोकाही अरविंद सावंत यांनी बोलून दाखवला.

दरम्यान, “उद्या विरोधी पक्षाची बैठक आहे. आदरणीय उद्धव ठाकरे यासंदर्भात आम्हाला मार्गदर्शन करतील. आम्ही मुद्द्यावरुन विरोध करु. विरोधाला विरोध करणार नाही. आम्ही विरोध का करतोय? हेसुद्धा सांगू. त्या विधेयकामधील त्रुटीही सांगू ,” असे म्हणत अरविंद सावंत यांनी या विधेयकाबाबत ठाकरे गटाची भूमिका बिल आल्यानंतरच स्पष्ट होईल असे संकेत दिले आहेत.

Follow Us
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...