AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger Sterilization: देशात पहिल्यांदाच वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव! चंद्रपूरमध्ये नेमकं काय घडलं? वन विभागाचा मोठा खुलासा

Chandrapur Proposes Tiger Sterilization to Control Population: चंद्रपुरात वाघांची नसबंदी होण्याची शक्यता आहे. वनविभागाने केंद्र सरकारकडे विशेष परवानगी मागितली आहे. यामुळे आता याची चर्चा होत आहे.

Tiger Sterilization: देशात पहिल्यांदाच वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव! चंद्रपूरमध्ये नेमकं काय घडलं? वन विभागाचा मोठा खुलासा
Why Chandrapur Wants Special Permission for Tiger Sterilization
| Updated on: Nov 27, 2026 | 4:40 PM
Share

चंद्रपूरातून एक बातमी समोर आली आहे. एका निर्णयाची चर्चा राज्यात चांगलीच रंगल्याचे पाहायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची वाढती संख्या आणि मानव-वन्यजीव संघर्षाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाघांच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांचे तसेच पाळीव प्राण्यांचे बळी जात असल्याने आता वाघांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर वनविभागाने वाघांच्या नसबंदीची विशेष परवानगी केंद्र सरकारकडे मागितल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघांच्या नसबंदीसाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागण्यात आलेला चंद्रपूर हा देशातील पहिला आणि एकमेव जिल्हा असल्याचा दावा करण्यात येत आहे. वनविभागाकडून यासंदर्भात सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे वाघांची वाढती संख्या रोखण्यासाठी वनविभाग आता नसबंदीचा पर्याय गांभीर्याने विचारात घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.

या प्रश्नावरून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, राज्याच्या माजी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज त्यांनी मुल तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेत थेट चंद्रपूर वनविभागाच्या मुख्यालयावर धडक दिली. वाघांच्या वाढत्या संख्येमुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.

वाघांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासोबतच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांपासून नागरिकांचे संरक्षण, शेतकऱ्यांचे नुकसान आणि पाळीव प्राण्यांच्या मृत्यूचा प्रश्न यांसह विविध मागण्या यावेळी वनविभागासमोर मांडण्यात आल्या. केवळ आश्वासनांवर न थांबता ठोस उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांनी उपस्थितांना उत्तर देताना वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आल्याचा महत्त्वपूर्ण खुलासा केला.

या प्रस्तावाला केंद्राची परवानगी मिळाल्यानंतरच पुढील कार्यवाहीबाबत निर्णय होऊ शकतो. एकीकडे वाघांचे संवर्धन आणि दुसरीकडे मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. त्यामुळे चंद्रपूरमधील वाघांच्या नसबंदीच्या प्रस्तावावर केंद्र सरकार काय निर्णय घेणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Follow Us
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया