
छोट्या पड्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून भाबीजी घर पर है पाहिली जाते. या मालिकेतील अंगूरी भाभी हे पात्र कायमच चर्चेत राहिले आहे. आता पुन्हा एकदा या पात्राची चर्चा सुरु आहे. कारण अभिनेत्री शिल्पा शिंदे जवळपास 10 वर्षांनंतर पुन्हा शोमध्ये परत आली आहे. तिच्या परत येण्याने चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. कारण जेव्हा मालिका सुरु झाली होती तेव्हा भाबीजीच्या भूमिकेत प्रथम शिल्पाचा चेहरा समोर आला होता. पण नंतर तिने मालिका सोडली होती. आता अभिनेत्रीने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये मालिकेत परतण्यामागचे कारण सांगितले आहे. तिने सांगितले की तिने कठीण मार्ग निवडला होता. शिल्पा या मालिकेत परत का आली आहे चला जाणून घेऊया…
22 डिसेंबरपासून भाबीजी घर पर है २.० सुरू होत आहे. मजेदार आणि नवीन कथानकासह लोकांना आता जुनी अंगूरी भाबी पाहण्याची संधी मिळणार आहे. याबद्दल बोलताना अंगूरी भाबी उर्फ शिल्पा शिंदे यांनी माध्यमांशी सांगितले, “10 वर्ष काय 20 वर्षही लागू शकत होते, कारण कधीच विचार केला नव्हता की मी परत येईन किंवा हे करेन.” आपल्या प्रवासाबद्दल बोलताना अभिनेत्री भावुक झाली आणि म्हणाली की इंडस्ट्रीत आपली जागा निर्माण करणे खूप कठीण आहे.
भावुक झाली शिल्पा शिंदे
लोकांच्या प्रेमाबद्दल बोलतान शिल्पा शिंदे म्हणाली की जर भाबीजी २.० म्हणजे शिल्पा शिंदे असे म्हटले जात असेल तर हे मी कमावले आहे. यावेळी शिल्पा खूप भावुक झाली. तिने सांगितले की मी सत्याचा मार्ग निवडला होता, जो खूप कठीण असतो. पण मला हे माहित होते की मी काही चुकीचे केले नाही, म्हणून माझ्याशी कधीच चुकीचे होणार नाही. अभिनेत्रीने सांगितले की प्रेक्षक ज्या प्रकारे आनंदी झाले आहेत. मी फक्त प्रेक्षकांसाठीच परत आले आहे.
प्रेक्षकांसाठी परत आली
अभिनेत्रीने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले की मी प्रेक्षकांना आनंदी करण्यासाठी आले आहे. त्यांचे जे काही स्वप्न तुटले होते, ते आता मी पूर्ण करेन. शिल्पाने टीव्ही इंडस्ट्रीला व्हाईट कॉलर माफिया म्हणत सांगितले की जेव्हा त्या काही करू इच्छित होत्या, तेव्हा लोकांनी त्यांना काही करू दिले नाही. मात्र, अभिनेत्रीने हेही सांगितले की त्यांनी नेहमीच सर्व गोष्टी खूप सकारात्मकपणे घेतल्या आहेत. अभिनेत्रीच्या परतीवर फॅन्स खूप आनंदी आहेत आणि येणाऱ्या नवीन कथानकासाठीही लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे.