Aaishvary Thackeray : बाळासाहेबांच्या नातवाची फसवणूक, 6 वेळा परदेशातून घडली धक्कादायक घटना, पोलीस चौकशी सुरु
Aaishvary Thackeray : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे याच्यासोबत परदेशातून एक दोन वेळा नाही तर, तब्बल सहावेळा धक्कादायक घटना घडली आहे. प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून, पोलीस कसून चौकशी करत आहे.

Aaishvary Thackeray : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) यांच्या नातवाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. बाळासाबेबांचा नारहूतू म्हटल्यानंतर सर्वात आधी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचं नाव समोर येतं. पण बाळासाहेबांचा नातू आणि अभिनेता ऐश्वर्या ठाकरे (Aaishvary Thackeray) याची सायबर फसवणूक (Cyber Fraud) झाल्याची माहिती समोर येत आहे. ऐश्वर्य ठाकरे याची एक दोन नाही तर, तब्बल सहा वेळा फसवणुकीचे व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऐश्वर्या ठाकरे याच्या सहा ट्रान्झॅक्शन्समधून एकूण 19 हजार 15 पैसे डेबिट झाल्याची माहिती समोर येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सर्व सहा व्यवहार परदेशातून झाल्याच उघड झालं आहे. तर 30 ऑक्टोबर रोजी हे व्यवहार झाल्याची माहिती समोर येत आहे… अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ऐश्वर्य याने याप्रकरणी ओशिवारा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता या प्रकरणी कसून चौकशी कपत आहे. फसवणुकीचा प्रकार कसा घडला आणि कोणी सर्व व्यवहार केले… याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
ऐश्वर्य ठाकरे याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो स्मिता ठाकरे आणि दिवंगत जयदेव ठाकरे यांचा मुलगा आहे. ऐश्वर्या ठाकरे याच्या कुटुंबाचा राजकारणात मोठा दबदबा असला तरी, ऐश्वर्या याने स्वतःचा वेगळा मार्ग निवडला आहे. त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ‘निशांची’ सिनेमातून ऐश्वर्या याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं.
‘निशांची’ सिनेमात ऐश्वर्य मुख्य भूमिकेत झळकला. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला. पण ओटीटीवर मात्र सिनेमा ट्रेंड होताना दिसला. बॉक्स ऑफिसवर सिनेमा सपशेल फेल ठरला. अशात ‘निशांची’ नंतर आता ‘निशांची 3’ मोठ्या पडद्यावर नाही तर, ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. दिग्दर्शक अनुराग कश्यपने चाहत्यांना सरप्राइज देत सिनेमाचा सीक्वेल थिएटरऐवजी थेट ओटीटीवर आणला आहे.
ऐश्वर्य ठाकरे फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच चर्चेत नसतो, तर खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. अभिनेत्री पूजा बेदी हिच्या मुलीसोबत ऐश्वर्यचं अफेअरच्या चर्चांनी एकेकाळी जोर धरलेला. अभिनेत्री अलाया एफ हिच्यासोबत ऐश्वर्य रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगलेल्या, पण दोघांमधील अफेअरच्या चर्चेविषयी विचारलं असता, अलायाने या अफवा धुडकावून लावल्या. आम्ही तर केवळ चांगले मित्र आहोत, असा दावा अलायाने केला.