सलमान खानची प्रकृती खालावली? व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत, थेट धर्मेंद्र यांच्यासारखीच..

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला. सलमान खानला कोणता तरी गंभीर आजार झाल्याचा दावा केला जात आहे. सलमान खान याचा चेहरा पूर्णपणे बदलला आहे. वजनही खूप जास्त कमी झाले. सलमान खान असल्याचेही ओळखणे कठीण झाल्याचे काहींनी म्हटले.

सलमान खानची प्रकृती खालावली? व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत, थेट धर्मेंद्र यांच्यासारखीच..
Salman Khan
| Updated on: Jul 19, 2026 | 1:45 PM

बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या मातृभूमी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. यादरम्यानच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघितल्यावर सलमान खान याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.  सलमान खानचा हा मातृभूमी चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होऊ शकतो. सलमान खान याला पाहून चाहते थक्क झाली आहेत. या व्हिडीओवर विविध प्रकारच्या कमेंट चाहत्यांकडून केल्या जात आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका वेगळ्या थकलेल्या अवस्थेत दिसत आहे. शिवाय त्याचा चेहराही काहीतरी वेगळाच झालाय. सलमान खान याचे लूक पूर्णपणे बदलले आहे. शिवाय वजनही प्रचंड कमी झाले. सलमान खान याला ओळखणेही कठीण झाले. हा व्हिडीओ बघितल्यावर कोणालाही वाटणार नाही की, हा सलमान खान आहे.

सलमान खान बाजूने गेला तरीही बॉलिवूड अभिनेता सलमान खान आहे हे कोणाच कळणार नाही. गगन चौधरी नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर केला. यासोबतच हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, सुरुवातीला त्यांना तो सलमान खान असल्याचे समजले नाही. मात्र, त्यांचा अंगरक्षक शेरा याला पाहिल्यानंतर त्यांना समजले की, हा सलमान खान आहे. सलमान खानला ओळखताही आले नाही.

यासोबतच त्यांनी म्हटले की, सलमान खान याची अवस्था बघितल्यावर धर्मेंद्र यांची आठवण झाली. तो इतका जास्त वेगळा दिसतो की, त्याला ओळखणेही कठीण झाले. या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. काहींनी फिरकीही घेतली. एकाने लिहिले की, खूप जास्त दारू पिल्याने असे होते. दुसऱ्याने लिहिले की, स्टेरॉयडचा हा सर्व परिणाम आहे. अजून एका युजर्सने लिहिले की, याला त्याच्या गुन्हाची शिक्षा मिळत आहे.

काही चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, सलमान खान याला गंभीर आजार झालेला दिसत आहे. एवीएम नावाचा आजार सलमान खान याला झाल्याचाही दावा काहींनी केला. या आजाराचा परिणाम त्याच्या चेहऱ्यावर दिसत असल्याचे काही चाहत्यांनी म्हटले. मात्र, सलमान खान याच्या या व्हिडीओने चाहते चिंतेत आहेत. सलमान खान याला नक्की काय झाले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Follow Us