
Shubhangi Sadavarte Divorce: फिल्म इंडस्ट्रीमध्ये सतत घटस्फोट हे होतच असतात. काही कलाकार लग्नाच्या काही महिन्यातच वेगळे होतात तर काही अनेक वर्षांचा संसार मोडतात. नुकताच प्रसिद्ध गायक राहुल देशपांडेने लग्नाच्या १७ वर्षांनंतर घटस्फोट घेतला. त्यानंतर आता मराठमोळी अभिनेक्षी शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट झाला आहे. तिने संगीतकार आनंद ओकशी लग्न केले होते. पण आता दोघेही विभक्त झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या घटस्फोटाचे कारण नेमकं काय? हे अद्याप समोर आलेले नाही.
‘संगीत देवभाबळी’ नाटकात अभिनेत्री शुभांगी सदावर्तेना महत्त्वाची भूमिका साकरली होती. तिला या नाटकातीन प्रसिद्धी मिळाली होती. 2020मध्ये आनंद ओकशी लग्न केले होते.आता लग्नाच्या पाच वर्षांतच दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. रंगभूमी गाजवणाऱ्या या जोडीने घेतलेल्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट म्हणजे नेमकं काय? सरकार आणि जरांगेंमध्ये त्यावरुन झालेला वाद काय?
सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
आनंद ओकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोट घेतल्याची माहिती दिली आहे. “आम्ही काही वर्षांपूर्वीच वेगळे झालो होतो, पण आता हा निर्णय जाहीर करण्यासाठी योग्य वेळ आहे… आम्ही एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल मी कृतज्ञ आहे. तसेच मी शुभांगीला तिच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो… शुभांगी एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि चांगली व्यक्ती आहे… भविष्यात जेव्हा संधी मिळेल, तेव्हा आम्ही दोघेही पूर्वीसारखेच एकत्र काम करू” या आशयाची पोस्ट आनंद यांनी केली आहे.
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
सध्या सोशल मीडियावर आनंद यांची ही पोस्ट व्हायरल झाली असून अनेकजण कमेंट्स करताना दिसत आहेत. शुभांगीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिने ‘संगीत देवबाभळी’ नाटकातसंत तुकारामांच्या पत्नीची भूमिका साकारली. तिच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी विशेष प्रेम केले. तर आनंदने या नाटकाला संगीत दिले होते.