
भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलचा गुरुवारी वाढदिवस होता. यानिमित्त अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र यात शुभमनच्या एका मित्राने लिहिलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. शुभमन साराला डेट करत असल्याचा अंदाज यावरून नेटकरी वर्तवत आहेत.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये शुभमन गिल अभिनेत्री सारा अली खानसोबत दिसत होता. हे दोघं एका रेस्टॉरंटमध्ये बसले होते.

व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलंय. अशा परिस्थितीत शुभमनचा मित्र खुशप्रीत सिंगने वाढदिवसाच्या पोस्टमध्येही साराचा उल्लेख केला. शुभमनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खुशप्रीतने लिहिलं - बहुत सारा प्रेम. यात त्याने इंग्रजीमध्ये Sara या शब्दाला हायलाइट करत SARA असं लिहिलं.

जेव्हा त्याच्या या पोस्टची सर्वत्र याबद्दल चर्चा होऊ लागली, तेव्हा खुशप्रीतने त्याचं कॅप्शन पुन्हा एडिट केलं आणि सारा हा शब्द सामान्य पद्धतीने लिहिला.

खुशप्रीतच्या सारा या कॅप्शननंतर नेटकरी सोशल मीडियावर विचारू लागले की शुभमन गिलला कोणती सारा आवडते? सारा अली खान की सारा तेंडुलकर?

सारा अली खानच्या आधी शुभमन गिलचं नाव सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकरशी जोडलं जात होतं. या दोघांना काही वेळा एकत्र पाहिलं गेलं होतं. एवढंच नाही तर दोघं एकमेकांच्या पोस्टवर कमेंटसुद्धा करायचे.