श्वेता तिवारीची लेक पलक देणार अजय देवगणला टक्कर; ज्या व्यक्तीने आईला संधी दिली, त्याच्याचसाठी बनणार धोका?

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या कामाने लोकांना प्रभावित करतेच पण त्याहूनही अधिक, ती तिच्या फिटनेसने सर्वांचे लक्ष वेधून घेते. श्वेता तिवारीने अनेक टीव्ही शो केले आहेत, परंतु काही मोठ्या चित्रपटांमध्येही ती दिसली आहे. गेल्या वर्षी ती 'सिंघम अगेन' मध्ये दिसली होती.चित्रपटात ज्या अजय देवगणने तिला संधी दिली त्यालाच आता श्वेताची लेक पलक टक्कर देण्यासाठी सज्ज आहे.

श्वेता तिवारीची लेक पलक देणार अजय देवगणला टक्कर; ज्या व्यक्तीने आईला संधी दिली, त्याच्याचसाठी बनणार धोका?
Shweta Tiwari Daughter Palak
Image Credit source: instagram
| Updated on: Apr 22, 2025 | 3:59 PM

टीव्ही इंडस्ट्री ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी आणि बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींनाही टक्कर देणारी 44 वर्षीय श्वेता तिवारी काहीना काही कारणाने चर्चेत असते. लोकं तिच्या चित्रपटांपेक्षा आणि अभिनयापेक्षाही तिच्या फिटनेसचे चाहते जास्त आहेत.या वयातही श्वेताने ज्या पद्धतीने स्वत:ला फिट ठेवलं आहे ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. लोकं तिच्या फिटनेसने अधिक प्रभावित होतात.

श्वेता तिवारीची लेक पलक अजय देवगणला टक्कर देणार 

ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री बऱ्याच काळापासून कोणत्याही कार्यक्रमात दिसलेली नाही. ती शेवटची ‘सिंघम अगेन’ मध्ये दिसली होती. तिने अजय देवगणच्या टीममधील एका पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली होती. आता श्वेता तिवारीची लेक पलक त्याच अजय देवगणला टक्कर देताना दिसणार आहे. तेही थेट चित्रपटाच्या माध्यमातून.

पलक तिवारीचा चित्रपट अजयच्या चित्रपटाशी करणार स्पर्धा 

पलक तिवारीचा चित्रपट ‘भूतनी’ हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. आणि अजय देवगणचाही ‘रेड 2’ हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शीत होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग काही वर्षांपूर्वी आला होता, जेव्हा तो अमय पटनायकच्या भूमिकेत प्रसिद्ध झाला होता. आता चित्रपटाचा दुसरा भागही प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच जबरदस्त आहे. सुरुवातीला 1 मे रोजी प्रदर्शित होणारा हा एकमेव चित्रपट होता त्यामुळे त्याला स्पर्धा करणारा एकही चित्रपट त्यावेळी नव्हता. संजय दत्तचा ‘भूतनी’ चित्रपट ‘रेड 2’ सोबत स्पर्धा करणार आहे. खरंतर, हा चित्रपट 18 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता पण त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. संजय दत्तच्या या चित्रपटातून पलक तिवारीही पुनरागमन करत आहे.


1 मे रोजी कोणाच्या चित्रपटाची जादू चालणार?

1 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या ‘भूतनी’ चित्रपटात पलक ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ती भूताच्या भूमिकेत दिसत आहे.तिचे रुप तसे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे अशी चर्चा करण्यात येत आहे की, ‘सिंघम अगेन’ मध्ये श्वेता तिवारीला मोठी संधी देणारा अजय देवगण होता. तथापि, त्या चित्रपटातील तिचा स्क्रीन टाइम खूपच कमी होता. पण तिची भूमिका लक्षात राहणारी होती. त्यामुळे 1 मे रोजी श्वेता तिवारीची मुलगी पलकच्या चित्रपटाची जादू चालतेय कि, अजय देवगणच्या ‘रेड 2’ची हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.