Shweta Tiwari : पलकमुळे हादरली श्वेता तिवारी, म्हणाली – मला दुसरी मुलगी नकोच !

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी केवळ तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच नाही तर तिच्या वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते.तिची मुलगी पलक तिवारीमुळे ती एकदा एवढी घाबरली की तिने एक मोठं वक्तव्य केलं. मला दुसरी मुलगी नकोच, असं ती म्हणाली होती. पलकने असं नेमकं काय केलं होतं ?

Shweta Tiwari : पलकमुळे हादरली श्वेता तिवारी, म्हणाली - मला दुसरी मुलगी नकोच !
श्वेता आणि पलक तिवारी
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 20, 2025 | 3:31 PM

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिचं नाव माहीत नाही, असे फार कमी लोकं असतील. तिचं नाव घराघरांत पोहोचलं आहे. तिच्याबद्दलची प्रत्येक छोटी-मोठी बातमी जाणून घेणे चाहत्यांना आवडते. टीव्ही आणि चित्रपटांमध्ये आपले दमदार अभिनय कौशल्य दाखवणारी श्वेता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. दोन लग्नं आणि दोन घटस्फोटानंतर श्वेता आता तिच्या दोन मुलांसोबत चांगलं आयुष्य जगत आहे. श्वेतासोबत तिची मुलगी पलक तिवारीही सध्या चर्चेत आहे. या मायलेकीच्या जोडीवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. पलकशिवाय श्वेताला एक मुलगा रेयांश देखील आहे. याचदरम्यान श्वेताचं एक जुनं विधान पुन्हा चर्चेत आलं आहे.

2020 मध्ये, श्वेता तिवारीने एक मुलाखत दिली होती. तेव्हा ती म्हणाली होती की, तिला पलकनंतर दुसरी मुलगी हवी होती. पण नंतर तिने हा निर्णय बदलला, त्यामागचं कारणही तिने स्पष्ट केलं. तेव्हा श्वेता तिवारीने खुलासा केला की पलक 16 वर्षांची असताना ती गर्भवती होती. आपल्या मुलीबद्दल बोलताना श्वेता म्हणाली, “तिच्या 16व्या वाढदिवसाला तिने घराबाहेर पडून 1 लाख 80 हजार रुपयांचा मेकअप, खूप महागडे प्रोडक्ट खरेदी केले. प्रत्येक आय शॅडोची किंमत 7 हजार ते 8 हजार रुपये होती.

दुसरी मुलगी नकोच

श्वेता पुढे म्हणाली की, नंतर तिने तिच्या कुटुंबियांना फोन केला आणि सांगितलं की, मला आता मुलाला जन्म द्यायचा आहे. पलकची महागडी खरेदी पाहिल्यानंतर श्वेताने घरच्यांना सांगितले की, “मी इतका खर्च करू शकत नाही. मला दुसरी मुलगी नकोच,” असं ती म्हणाली होती. या मुलाखतीत श्वेतासोबत मुलगी पलकही उपस्थित होती. तिनेही आईबद्दलच्या अनेक गोष्टी शेअर केल्या. ती म्हणाली की लहानपणी कधी कधी आईला ‘दीदी’ म्हणायची, कारण तिला ती तिची आई नव्हे तर बहीणच वाटायची.

 

मायलेकीत दोस्तीचं नातं

श्वेता ही तिची मुलगी पलकची आई आणि वडील दोघेही आहे. तिचं तिच्या लेकीशी मैत्रीचं नातंही आहे. मायलेकींची ही जोडी बरेचदा एकमेकींसोबतचे फोटो शेअर करत असतात. दरम्यान पलकनेही बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं असून ती कामात व्यस्त असते. गेल्या काही वर्षांपासून तिचं नाव अभिनेत्री अमृता सिंग आणि अभिनेता सैप अली खान यांचा मुलगा इब्राहिम अली खान याच्याशी जोडलं जातंय, त्यांना अनेकदा एकत्र स्पॉटही केलं जातं.