
AR Rahman Reaction: ऑस्कर विजेते आणि बॉलिवूडचे लोकप्रिय संगीतकार ए. आर. रेहमान यांनी इंडस्ट्रीमध्ये जवळपास 3 दशक राज्य केलं आहे. यावेळी ए. आर. रेहमान यांनी अनेक पुरस्कारांवर स्वतःचं नाव कोरलं आहे. पण अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्ये देखील रेहमान यांचं नाव समोर आलं. पण आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, रेहमान यांनी ‘छावा’ सिनेमाबद्दल स्वतःचं मत मांडलं. ज्यामुळे अनेकांनी रेहमान यांच्यावर निशाणा साधला. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील यावर टीका केली.
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, गायक शान आणि अभिनेत्री कंगना राणौत यांनी ए. आर. रेहमान यांच्या कम्युनल वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. अनेकांनी रेहमान यांचं समर्थन केलं. तर अनेकांनी ए. आर. रेहमान यांचा विरोध देखील केला. आता, संगीतकाराने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे आणि विधानाचं स्पष्टीकरण दिलं आहे. ऑस्कर विजेत्या संगीत दिग्दर्शकाचं काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया.
ए. आर. रेहमान म्हणाले, ‘प्रिय मित्र… संगीत कायम माझ्यासाठी आनंद साजरा करण्याचा आणि संस्कृतीचा सम्मान करण्याचं माध्यम आहे… भारत माझी प्रेरणा आहे… माझे गुरु आहेत आणि माझं घर देखील आहे. मी समजू शकतो की कधी – कधी विचारांमध्ये गैरसमज होऊ शकतात. पण माझं लक्ष्य कायम संगीताच्याच्या माध्यमातून यशाकडे जाणं आहे…’
पुढे रेहमान म्हणाले, ‘माझा कधीही कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता आणि मला आशा आहे की लोक यावर माझ्याशी सहमत होतील. एक भारतीय म्हणून मी स्वतःला धन्य समजतो… यामुळे मला स्वतःला व्यक्त करण्याचं आणि देशाच्या विविध संस्कृतींचा उत्सव साजरा करण्यासाठी स्वातंत्र्य मिळालेलं आहे.’
‘छावा’ सिनेमाबद्दल ए. आर. रेहमान म्हणाले, ‘छावा सिनेमा हा फूट पाडणारा सिनेमा आहे. कथेचा गाभा शौर्य दाखवणारा असला तरी, फूट पाडण्याच्या गोष्टींमुळे चित्रपटाला अधिक फायदा झाला…’, सांगायचं झालं तर, सिनेमा 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला. सिनेमात अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी मुख्य भूमिका साकारली होती.