Lata Mangeshkar health update : लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, मात्र पुढचे 7-8 दिवस दिदी वैद्यकीय देखरेखीखाली, डॉक्टरांची माहिती

| Updated on: Jan 15, 2022 | 12:06 PM

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना 4 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Lata Mangeshkar health update : लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, मात्र पुढचे 7-8 दिवस दिदी वैद्यकीय देखरेखीखाली, डॉक्टरांची माहिती
लता मंगेशकर
Follow us on

मुंबई : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना 4 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात  (Breach Candy Hospital) उपचार सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांना कोरोनासोबतच न्युमोनिया देखील झाला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

लतादिदींच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी काय माहिती दिली?

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात सुरू आहेत. लतादिदींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र त्यांचं वय पाहता 7 ते 8 दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आलं. तिथं त्यांच्यावर मागच्या 4 दिवसांपासून उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांचं वय आणि त्यांची प्रकृती पाहता त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांचं सध्या वय 92 वर्ष आहे. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सगळीकडे प्रार्थना केल्या जात आहेत. नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

लता मंगेशकर यांचा अनेक पुरस्कारांनी सम्मान

गानकोकीळा लता मंगेशकर यांनी वयाची 92 वर्ष पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी झाला. लतादीदींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय त्या दादासाहेब फाळके पुरस्कार आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत. 1974 मध्ये, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना इतिहासातील सर्वाधिक रेकॉर्डिंग केलेल्या कलाकार म्हणून स्थान दिले. त्यांनी 1948 ते 1974 या काळात 25,000 हून अधिक गाणी गायली आहेत.

संबंधित बातम्या

Tiktok Star | टिकटॉक स्टार सुरज चव्हाणची ‘गोलीगत’ भरारी, मराठी चित्रपटात हिरो म्हणून झळकणार

सलमान खानचा शेजाऱ्यावर मानहानीचा दावा, मुंबई दिवाणी न्यायालय म्हणाले, ‘आम्ही नकार देतो!’

देशातलं नंबर 1 न्यूज नेटवर्क tv9 एनबीडीएतून (NBDA) बाहेर, न्यूज रेटींग्जमधल्या वेळ काढूपणाला विरोध