स्मृती ईराणी यांनी Bill Gates यांना शिकवली खिचडी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ फेम स्मृती इराणी यांनी Bill Gates यांच्यासोबत बनवली खिचडी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चर्चांना उधाण

स्मृती ईराणी यांनी Bill Gates यांना शिकवली खिचडी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Mar 04, 2023 | 11:05 AM

Smriti Irani Bill Gates Video : भाजप नेत्या स्मृती इराणी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता तर स्मृती ईराणी यांनी चक्क ‘मायक्रोसॉफ्ट’ चे को-फाउंडर बिल गेट्स (Bill Gates) यांच्यासोबत खिचडी तयार केली आहे. सध्या स्मृती ईराणी आणि बिल गेट्स यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या व्हिडीओचीच चर्चा आहे. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ फेम स्मृती इराणी आणि बिल गेट्स यांच्या व्हिडीओवर अनेक जण कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

बिल गेट्स जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’चे मालक आणि ‘गेट्स फाउंडेशन इंडिया’चे अध्यक्ष बिल गेट्स यांना स्मृती ईराणी यांच्यासोबत खिचडी बनवताना पाहाताना अनेक जण हैराण झाले. सध्या सर्वत्र त्यांच्या व्हिडीओची चर्चा आहे. नुकताच बिग गेट्स यांनी मुंबईत ‘नरिशमेंट कँपेन’मध्ये उपस्थिती दर्शवली होती.

 

 

खुद्द स्मृती ईराणी यांनी बिल गेट्स यांच्यासोबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये बिल गेट्स हे स्मृती ईराणी यांच्यासोबत खिचडी बनवताना दिसत आहे. याठिकाणी खुद्द बिल गेट्स यांनी खिचडीला तडका लावला आहे. व्हिडीओ शेअर करत स्मृती ईराणी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘भारतातील सुपर फूड… जेव्हा बिल गेट्स यांनी खिचडीला तडका लावला…’ सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

स्मृती ईराणी यांनी अनेक वर्ष टीव्ही विश्वावर राज्य केलं, त्यानंतर त्यांनी झगमगत्या विश्वाला राम राम ठोकत आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेती त्यांच्या ‘तुलसी’ या भूमिकेने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. आज देखील स्मृती ईराणी यांना अनेक जण तुलसी या नावाने ओळखतात. तुलसी या भूमिकेनंतर स्मृती ईराणी यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.

‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिके शिवाय स्मृती ईराणी यांनी, ‘आतिश’, ‘हम हैं कल आज और कल’, ‘रामायण’, ‘विरुद्ध’, ‘थोडी सी जमीन थोडा सा आसमना’ या मालिकांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.