Actress life: ‘एका रात्रीचा रेट किती अन्…’, पुरुषांच्या अशा वक्तव्यांवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा संताप, म्हणाली तरी काय?

Actress life: इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना प्रत्येक अभिनेत्रीच्या आयुष्यात चांगले वाईट अनुभव येत असतात. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने पुरुषांकडून होणाऱ्या विचित्र वक्तव्यांवर संताप व्यक्त केला आहे. जाणून घ्या अभिनेत्री अखेर म्हणाली तरी काय?

Actress life: एका रात्रीचा रेट किती अन्..., पुरुषांच्या अशा वक्तव्यांवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा संताप, म्हणाली तरी काय?
Anjali Arora
| Updated on: Oct 11, 2026 | 8:56 AM

Actress life: सोशल मीडिया आता असं एक प्लॅटफॉर्म झालं आहे, ज्यामुळे अनेक सोशल मीडिया स्टार झगमगत्या विश्वापर्यंत पोहोचले. पण सोशल मीडियाचं हे विश्वा वाटतं तेवढं सोपं नाही… यामागचा काळोख इतका भयानक आणि कडू असतो, ज्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. असंच काही ‘कच्चा बदाम गर्ल’ अजंली अरोरा हिच्यासोबत झालं आहे. आज अंजली हिने कोणत्या ओळखीची गरज नाही, पण तिने धक्कादायक परिस्थितीचा सामना केला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, अंजली हिने तिच्या सोशल मीडिया पोस्टवर येणाऱ्या विचित्र कमेंटबद्दल खुलासा केला आहे. ‘एका रात्रीचे किती घेशील….’, असं देखील तिला कमेंटमध्ये अनेक पुरुषांनी विचारलं आहे. इंटरनेटच्या आडून एखाद्या महिलेचं चारित्र्य मलीन करण्यास मागे-पुढे न पाहणाऱ्यांना अंजलीने निर्भयपणे प्रत्युत्तर दिले.

मुलाखतीत अंजली हिला विचरण्यात आलं की, ‘कच्चा बदाम’ गण्यानंतर तिला बदनाम का करण्यात आलं. यावर ती स्वतः हैराण झाली आणि म्हणाली, ‘मला आजपर्यंत कळलं नाही की, लोकांनी असं का केलं, त्या रीलमध्ये मी पूर्ण कपडे घातलेले. त्यामध्ये काहीही असं वल्गर नव्हतं… सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशातील बड्या सेलिब्रिटींनी देखील गाणयावर रिल बनवले आणि पोस्ट केले. पण निशाणा फक्त अंजली हिच्यावर साधण्यात आला.

Loading...

यावर अंजली म्हणते, ‘मला असं वाटतं की, यामध्ये माझी काहीच चूकन नाही. त्याऐवजी, जे प्रत्येक गोष्टीकडे एका विकृत दृष्टिकोनातून पाहतात, त्या लोकांची चूक आहे… ते अशा प्रकारे वागतात की जणू काही एखादा गंभीर गुन्हाच घडला आहे.’, त्यानंतर मुलाखतीत, तिच्या पोस्टवर करण्यात आलेल्या वाईट कमेंट देखील वाचून दाखवण्यात आल्या… तेव्हा समाजाच्या कुजक्या मानसिकतेचं खरं रूप उघड झाले आहे.

अंजलीच्या पोस्टवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘दिग्दर्शकाने वाकवलं असेल…’, दुसरा नेटकरी म्हणाली, ‘दिग्दर्शकासोबत शारीरिक संबंध असतील..’, तर तिसरा नेटकरी म्हणाला, ‘एका रात्रीसाठी किती पैसै घेतले?’ यावर अंजली म्हणते, अशा गोष्टी लिहिल्या जातात, ज्याबद्दल मी स्वतः विचार देखील करु शकत नाही…

आपलं म्हणणं मांडताना अंजली हिने समाजातील या प्रतिगामी मानसिकतेवर कडक शब्दांत टीका केली. तिने स्पष्ट केलं की, हा सर्व विचारसरणी आणि दृष्टिकोनातील फरकाचा प्रश्न आहे; लोक आपल्याच विकृत कल्पनाशक्तीच्या आधारे कोणाच्याही चारित्र्यावर सहजपणे शिंतोडे उडवतात. शेवटी, तीव्र उपरोधाचा सूर लावत तिनं असं देखील म्हटलं की, ज्यांचे विचारच घाण आणि दुर्गंधीने माखलेले आहेत, त्यांच्याबद्दल फारसं काही बोलण्यासारखं उरलेलं नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us