AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Division : पाकिस्तानचा आणखी एक तुकडा? नव्या देशाचं नावही ठरलं, शाहबाज यांची झोप उडाली!

सिंधुदेशाची मागणी खूप जुनी आहे. सिंध प्रांताला पाकिस्तानातून वेगळं करून एका स्वतंत्र देशाची स्थापना करावी, अशी मागणी यामागे आहे. या विचाराचे रुपांतर आंदोलनात करण्याचे श्रेय सिंधी नेते जी एम सैयद यांना जाते.

Pakistan Division : पाकिस्तानचा आणखी एक तुकडा? नव्या देशाचं नावही ठरलं, शाहबाज यांची झोप उडाली!
pakistan division and sindh new countryImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 25, 2026 | 6:15 PM
Share

Pakistan Sindh Protest : पाकिस्तानात कधी काय होईल हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून या देशातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये स्थानिक पातळीवर अनेक आंदोलनं उभी राहात आहेत. प्रशायकीय सोईसाठी एकीकडे पाकिस्तानचे साधारण 15 विभाग करण्याचा विचार पाकिस्तान सरकार करत आहे. तर दुसरीकडे बलुचिस्तान सारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रांतात विशेष अधिकारी, मानवी हक्कांसाठी नवा लढा उभारला जातोय. हा मुद्दा सध्या पाकिस्तानच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. असे असतानाच आता या देशाचा आणखी एक तुकडा करून थेट सिंधूदेश स्थापन करावा अशी मागणी केली जातेय. या मागणीसाठी अनेक पाकिस्तानी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

22 नोव्हेंबर रोजी रॅली, आता गदारोळ

पाकिस्तानात अनेक ठिकाणी बंडाचा झेंडा फडकवला जातोय. 1971 पाकिस्तानचे विभाजन झाले. त्यानंतर पूर्व पाकिस्तानाचा बांगलादेश हा नवा देश स्थापन झाला. बलुचिस्तान या प्रांततही आम्हाला वेगळ्या देशाचं स्थान हवंय, अशी मागणी जोर धरू लागलीय. त्यानंतर आता सिंध प्रांतातूनही लोकांकडून आम्हाला नवा सिंधूदेश हवा आहे, अशी मागणी केली जातेय. याच मागणीला घेऊन या भागात 22 नोव्हेंबर रोजी एक रॅल काढण्यात आली. या रॅलीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या रॅलीमध्ये लोकांनी ‘आम्हाला पाकिस्तान देश नकोय’ अशा घोषणा देण्यात आल्या. सोबतच सिंधुदेशाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. या रॅलीनंतर 24 नोव्हेंबर रोजी सिंध प्रांतातील विधानसभेत मोठा गदरोळ पाहायला मिळाला. MQM-P पक्षाच्या नेत्यांनी पाकिस्तानविरोधी नारेबाजी करणाऱ्यांवर काय कारवाई केली जाईल, अशी विचारणा केली आहे.

सिंधुदेशाची मागणी सर्वप्रथम कोणी केली होती?

सिंधुदेशाची मागणी खूप जुनी आहे. सिंध प्रांताला पाकिस्तानातून वेगळं करून एका स्वतंत्र देशाची स्थापना करावी, अशी मागणी यामागे आहे. या विचाराचे रुपांतर आंदोलनात करण्याचे श्रेय सिंधी नेते जी एम सैयद यांना जाते. 1971 साली बांगलादेशाची स्थापना झाल्यानंतर जी एम सैयद यांनीही सिंध प्रांताला वेगळी ओळख हवी असून आम्हाला स्वातंत्र्य हवंय अशी मागणी केली. याच मागणीसाठी त्यांनी 1972 साली जेय सिंध महाज या मंचाची स्थापना केली. आता या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार, पाकिस्तानचे पुन्हा तुकडे होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला..
पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला धक्कादायक अनुभव
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM..
इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर 5 कोटींच्या मागणीचा आरोप, थेट CM फडणवीसांवरही निशाणा
कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक...
Parli : कांद्याला 50 रुपये भाव, पण पाण्याअभावी परळीच्या शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त!
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील...
जळगावच्या 6 मजुरांना गुजरातमध्ये कालव्यात फेकले; एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत!
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!