
मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांच्याप्रमाणेच त्यांचा लाडका लेक, सोहम बांदेकर (Soham Bandekar) हाही मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोहमच्या लग्नाबद्दल बरीच चर्चा सुरू होती. आता त्याबद्दलच एक मोठी अपडेट समोर आली असून सोहम हा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी येऊन नुकतंच सोहमचं थाटात केळवण केलं, त्याचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे सोहमच्या लग्नाच्या बातम्यांवर एकाप्रकारे शिक्कामोर्तबच झालं आहे.
मात्र सोहमची होणारी पत्नी आणि बांदेकरांची भावी सूनबाई हिचं नाव अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेलं नाही. असं असलं तरी अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासोबत त्याच्या नात्याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू असून सोहम लवकरच अभिनेत्री पूजा बिरारीशी लग्न करणार असल्याचं वृत्त ‘राजश्री मराठी’ने सूत्रांमार्फत दिलं होतं. त्यामुळे त्या दोघांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. मात्र त्या दोघांनी अद्याप नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. असं असलं तरीही पूजा बिरारीने दिवाळीचे फोटो तिच्या अकाऊंटवर शेअर केल्यानंतर सोहमने त्यावर कमेंट करत हार्ट इमोजी दिले होते.
बांदेकरांच्या भावी सुनबाईचं दर्शन झालं, घरच्या आरतीत ‘ती’ दिसताच चर्चांना उधाण
मराठी कलाकारांकडून सोहमचं केळवण
नुकतंच सोहमचं केळवण थाटात पार पडलं. ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, पूर्वा गोखले अभिजीत केळकर या नामवंत कलाकारांनी सोहमचं केळवण केलं. यावेळी त्याचे आईवडील अर्थात आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकरही उपस्तित होते. फुलांच्या पाकळ्या उधळून त्यांचं स्वागत करण्यात आलं. सुंदर मुंडावळ्या बांधलेला, सुहास्य वदनाने बसलेला सोहम यांचं औक्षण करण्यात आलं. कुरडई, पापड, भाजी, गुलबाजाम, पुरी असा जेवणाचा खास मेन्यू होता. त्याच्या केळवणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गणपती आरतीदरम्यान दिसली होती पूजा बिरारी
सोहम आणि अभिनेत्री पूजा बिरारीच्या नात्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. पूजाने ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मंजिरीची भूमिका साकारली होती. सोहम आणि पूजा लवकरच रणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. तर त्यानंतर गणेशोत्सवादरम्यान बांदेकरांच्या घरच्या गणपतीच्या आरतीचा व्हिडीओ आदेश बांदेकर यांनी शेअर केला होता. त्यावेळी देखील सुचित्रा बांदेकर यांच्या मागे पूजा दिसली होती. पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेली, हसतमुखाने टाळ्या वाजवत आरतीत मग्न झालेली पूजा आरतीसाठी उपस्थित होती. त्यावर अनेकांनी कमेंट्स करत लग्नाबद्दल विचारणा केली होती. , ‘ गणपती बरोबर तुमच्या भावी सुनबाई चे पण दर्शन झालं . सासू सून सोबत एकदम मस्त दिसते दृष्ट काढा ‘असंही एका चाहत्याने लिहीलं. पुजा बिरारी आणि सोहम ची news खरी आहे म्हणजे! अशी कमेंटही एकाने केली होती. तर आता सोहमच्या केलवणामुळे त्यांच्या लग्नाच्या बातमीवर एकाप्रकारे शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र सोहमचं लग्न कधी, त्याची तारीख कोणती हे जाणून घेण्याची चाहत्यांनी खूप उत्सुकता आहे.