बांदेकरांच्या भावी सुनबाईचं दर्शन झालं, घरच्या आरतीत ‘ती’ दिसताच चर्चांना उधाण
आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून मनोरंजन सृष्टीत आलेला सोहम हा अभिनेता तर आहेच पण निर्मिती क्षेत्रातही तो हळूहळू पाय रोवतोय. पण सध्या तो त्याच्या पर्सनल लाईफमुळे बराच चर्चेत आहे. एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीशी त्याचं नाव जोडलं जात आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम सध्या बराच चर्चेत आहे. आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून मनोरंजन सृष्टीत आलेला सोहम हा अभिनेता तर आहेच पण निर्मिती क्षेत्रातही तो हळूहळू पाय रोवतोय. पण सध्या तो त्याच्या पर्सनला लाईफमुळे बराच चर्चेत आहे. एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीशी त्याचं नाव जोडलं जात असून ते लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्याी समोर आल्या होत्या. अभिनेत्री पूजा बिरारीशी सोहम लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याचे वृत्त समोर आले. त्यावर पूजा, सोहम किंव त्याच्या आई-वडिलांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी एका व्हिडीओने मात्र त्यांच्या नात्याचं गुपित जणू उलगडलंच आहे.
बांदेकरांच्या घरातला गणपती खूप फेमस आहे, लहान-मोठे, सगळे एकत्र येऊन संपूर्ण कुटुंब गणेशोत्सवात बाप्पाची रोज आरती करतं. आदेश बांदेकर हे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दरवर्षी त्यांच्याकडील गणरायाचे फटो, आरतीचे व्हिडीओ टाकत असतात. त्यांच्या चाहत्यांनाही हे घरगुती वातावरण, प्रेम, जिव्हाळा खूप आवडतं,आदेश बांदेकरांच्या फोटांवर त्यामुळे भरपूर लाईक्स आणि कमेंट्स येत असतात.
बांदेकरांच्या घरी पूजा बिरारी
सालाबादप्रमाणे यंदाही आदेश बांदेकर यांनी गणपतीच्या आरतीचे काही व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकले, अनेकांनी त्याला लाईक करत कमेंट्सही केल्या. मात्र त्यातल्या एका व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. कारण त्यात बांदेकरांची भावी सूनबाई अनेकांना दिसली.
हो, हे खरं आहे, सोहम बांदेकरशी जिचं नाव सातत्याने जोडलं जात आहे, ती अभिनेत्री पूजा बिरारी ही बांदेकरांच्या घरच्या गणपतीच्या आरतीला आवर्जून उपस्थित होती. पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेली, हसतमुखाने टाळ्या वाजवत आरतीत मग्न झालेली पूजा, ही सुचित्रा बांदेकर यांच्यामागे उभी असलेली अनेकांना दिसली. अन् मग काय, आदेश बांदेकरांच्या या व्हिडीओवर कमेंट्सची बरसात झाली.
View this post on Instagram
सासू सून एकदम मस्त दिसते, चाहत्यांना आवडली जोडी
पूजा बिरारीच झलक पाहून अनेकांनी कमेंट केली. ‘भावी सूनबाई पण आहेत आरतीला,खूप छान अशी कमेंट एकाने केली’. तर, ‘ गणपती बरोबर तुमच्या भावी सुनबाई चे पण दर्शन झालं . सासू सून सोबत एकदम मस्त दिसते दृष्ट काढा ‘असंही एका चाहत्याने लिहीलं. पुजा बिरारी आणि सोहम ची news खरी आहे म्हणजे! अशी कमेंटही एका चाहत्याने केली असून आता यावर बांदेकर काय प्रतिक्रिया देतात आण अधिकृत घोषणा करतात का याचीच सर्वांना उत्सुकता आहे.
