Jalgaon | केळी गेली, मका गेला, गहूही गेला… सांगा जगायचं कसं? गारपीट-वादळाचा तडाखा; शेतकरी हवालदिल
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यांमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. अवकाळी पावसासोबत झालेल्या जोरदार वाऱ्यांमुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका गहू, हरभरा, मका आणि केळी या प्रमुख पिकांना बसला आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यांमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. अवकाळी पावसासोबत झालेल्या जोरदार वाऱ्यांमुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका गहू, हरभरा, मका आणि केळी या प्रमुख पिकांना बसला आहे. काढणीला आलेला गहू आणि हरभरा गारांच्या माऱ्याने आडवा झाला असून, मका पिकांचे कणीस तुटले आहेत. तर केळीच्या बागांमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली असून अनेक बागा पूर्णतः नष्ट झाली आहे. हातातोंडाशी आलेलं पिक काही तासांत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त भागांमध्ये शासनाकडून तातडीने पंचनामे करण्यात यावेत आणि शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉर तयार करणार! सीतारमण यांची घोषणा
खादी, हँडलूम उत्पादनाच्या वाढीवर भर - निर्मला सीतारमण
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात
12 वर्षांपासून नियोजनबद्ध विकास सुरु; सीतारमण यांनी दिली माहिती

