
23 सप्टेंबर रोजी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांना त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ते उपस्थित होते.
राणी आणि शाहरूखने पेहरावाने देखील चाहत्यांचे मन जिंकले
दोघांनीही पुरस्कार सोहळ्यात आपल्या पेहरावाने देखील चाहत्यांचे मन जिंकले. राणी मुखर्जीने राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तपकिरी रंगाची रेशमी साडी परिधान केली होती. तिने त्यावर नाजूकसा नेकलेस आणि कानातले घालून तिचा लूक अजून सुंदर केला होता. तर, शाहरुख खान काळ्या ब्लेझर आणि पँटमध्ये खूपच देखणा दिसत होता. त्याने काळ्या बुटांनी त्याचा लूक पूर्ण केला होता.
शाहरूख आणि राणीच्या मैत्रीमधील गोड क्षण
दरम्यान राणी आणि शाहरूख हे एकमेकांचे चांगले आणि जवळचे मित्र आहेत. या सोहळ्यातील शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्या सर्वांमध्ये शाहरूख आणि राणीच्या मैत्रीमधील काही गोड क्षण देखील पाहायला मिळाले. ते एकमेकांना मदत करताना दिसले.
गोंधळलेल्या राणीला शाहरूखने दिलं प्रोत्साहन
ऐके ठिकाणी शाहरुख खान राणी मुखर्जीच्या साडीचा पदर अगदी आदारात्मक पद्धतीने हाताळताना दिसत आहे. तसेच जेव्हा ती मेडल घेण्यासाठी स्टेजवर जाण्यासाठी सज्ज होती तेव्हा विस्कटलेले केसही नीट करताना तो दिसत आहे. शाहरुख खान राणी मुखर्जी आणि विक्रांत मेस्सीसोबत राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजच्या खाली उभे होते. आणि पहिल्यांदा राणी पुरस्कार घ्यायला जाणार होती. तेव्हा ती थोडीशी भांबावलेली दिसत होती. तेव्हा तिला विक्रांत आणि शाहरूख खान प्रोत्साहन देताना दिसले. तेव्हा शाहरुखने राणीला मिठी मारतो, तिच्या गालावर किस करत तिला प्रोत्साहन दिलं. चाहत्यांना शाहरूखची राणीप्रती असेललं मैत्रीचं आणि आदराचं घट्ट नात चाहत्यांना खूपच भावलं.
राणी मुखर्जीनेही किंग खानची हेअरस्टाईल दुरुस्त केली
तर त्याच पद्धतीने राणी मुखर्जी किंग खानची हेअरस्टाईल दुरुस्त करताना दिसत आहे. तर एका क्षणाला शाहरुख खान आणि राणी मुखर्जी फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे दिसत आहे. शाहरुख आणि राणी सोहळ्यात सेल्फी काढताना दिसत आहे.
सोहळ्यात उपस्थित असलेले सगळेच त्यांच्या मैत्री गोड क्षण कौतुकाने पाहत होते
तसेच या सोहळ्यात उपस्थित असलेले इतर पाहुणे मंडळी देखील त्यांच्या मैत्री हे गोड क्षण कौतुकाने पाहताना दिसत आहेत. हे गोड क्षण सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. चाहते नेहमी प्रमाणे या जोडीला तेवढंच प्रेम देताना दिसत आहे.