
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान त्याच्या चित्रपटांपेक्षाही त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहतो. त्याचे अफेअर्स आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचे किस्से आजही चर्चेचा विषय ठरतात. त्यांपैकी एक म्हणजे सोमी अली. तिने अनेकदा अनेक मुलाखतींमध्येही सलमानवर बरेच आरोप केले आहेत.तसेच तिने सलमानच्या वन नाईट स्टॅंडबद्दलही बरेच खुलासे केले आहेत. तसेच सोमीने सलमानने तिचे केवळ शारीरिक शोषण केले नाही तर तिला जबरदस्तीने गर्भपात करायला लावला होता हा धक्कादायक आणि सर्वात मोठा आरोपही तिने केला आहे.
सलमानचे बॅकअप डान्सर्स आणि एक्स्ट्रासोबतही शारीरक संबंध होते
तिने एकदा सोशल मीडियावर ‘आस्क मी एनीथिंग’ या फिचरच्या माध्यमातून तिच्या नेटकऱ्यांना तिला प्रश्न विचारण्याची संधी दिली होती. तेव्हा अनेकांनी तिला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, मुख्य म्हणजे सलमान आणि तिच्या नात्याबद्दल बरेच प्रश्न विचारले. तेव्हा एकाने तिला प्रश्न विचारला होता की, ती सलमानबद्दल जे काही बोलते, किंवा ज्या काही तक्रारी सांगते त्या फक्त प्रसिद्धीसाठी असतात का? त्यावर तिने स्पष्टच भाषेत सांगितलं की, “त्याने खूपवेळा माझा विश्वासघात केला आहे. एवढंच नाही तर त्याचे बॅकअप डान्सर्स आणि एक्स्ट्रासोबतही शारीरक संबंध होते. त्यावेळी तो कधीही गर्भनिरोधक वापर नव्हता, त्यामुळे अमेरिकेत गेल्यावर तिला एसटीडी चाचणी करावी लागली होती”
‘दर वेळी तो नव्या मुलीसोबत असायचा’
त्यानंतर जेव्हा नेटकऱ्यांनी सोमीला विचारले की तिने चित्रपटसृष्टी का सोडली, तेव्हा तिने सांगितले की तिला सलमानच्या नाईटस्टँडचा कंटाळा आला होता. ती म्हणाली की, ” मला सलमानच्या 8 नाईट स्टँडचा कंटाळा आला होता. तसेच, दररोज शारीरिक आणि शाब्दिक छळ सहन करावा लागत होता. दर वेळी तो नव्या मुलीसोबत असायचा या सगळ्याला मी कंटाळले होते म्हणून मी त्याला सोडण्याचा निर्णय घेतला”
ऐश्वर्याला देखील खूप शिवीगाळ केली होती
सलमानच्या एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या आणि कतरिनाबद्दल बोलताना सोमी म्हणाली, “त्याने ऐश्वर्याला देखील खूप शिवीगाळ केली होती आणि मला वाटतं की त्याने तिचा खांदाही फ्रॅक्चर केला असेल. कतरिनाबद्दल सांगायचं झालं तर मला तिच्याविषयी एवढी माहिती नाही”
मी बिश्नोई समुदायाच्या नेत्याला भेटणे पसंत करेन
त्यानंतर एका युजरने तिला विचारले की, तिच्या सलमानबद्दल एवढ्या वाईट भावना असूनही तिने बिश्नोई समुदायाची माफी का मागितली होती? तेव्हा सोमी म्हणाली, “मला सलमानशी बोलायचे नसल्याने, मी बिश्नोई समुदायाच्या नेत्याला भेटणे पसंत करेन जो एक अतिशय स्थिर आणि आदरणीय व्यक्ती वाटतो, लॉरेन्स आणि सलमानच्या विरोधात, ज्यांना दोघांनाही थेरपीची आवश्यकता आहे. आणि मी एक थेरपिस्ट म्हणून लॉरेन्सची माफी मागण्यास तयार झाले”
सर्वांना सलमान खानची भीती वाटते
तसेच सोमीला हेही विचारले गेले की इंडस्ट्रीतील कोणी तिच्याकडे मदतीसाठी आणि आधारासाठी संपर्क साधला आहे का, तेव्हा सोमी म्हणाली की सर्वांना भीती वाटते की सलमान विवेक ओबेरॉय आणि सोनू निगम यांच्याप्रमाणे त्यांचेही करिअर उद्ध्वस्त करेल. अशा पद्धतीने तिने नेटकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना सलमानच्या वाईट कर्मांचा पाढाच वाचला.
सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिने इंडस्ट्री सोडली
सोमी अली 1990 च्या दशकात सलमान खानला डेट करत होती. तिने1993 मध्ये ‘अंथ’ चित्रपटाद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले आणि 1999 मध्ये सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिने इंडस्ट्री सोडली. सध्या सामाजिक कार्यकर्त्या असलेली सोमी ‘नो मोर टीयर्स’ नावाची एक एनजीओ चालवते.