Somy Ali : तिच्या मृत्यूचं कारण…दिव्या भारतीबद्दल प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक दावा, काय म्हणाली?
Somy Ali On Divya Bharti : अभिनेत्री सोमी अलीनं दिव्या भारतीच्या मृत्यूबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अभिनेत्री अनेकदा तिच्या आणि सलमानच्या नात्याबद्दल भाष्य करताना दिसतेय. मात्र, आता सोमी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. यावेळेस तिनं सलमानबद्दल भाष्य केलं असून सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारतीबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. सोमी अली म्हणाली की, दिव्याच्या मृत्यूबद्दल फक्त मलाच माहिती आहे.
दिव्या भारतीबद्दल काय म्हणाली सोमी अली?
दिव्या भारतीबद्दल बोलताना सोमी अली म्हणाली की, ‘जेव्हा आमची पहिली भेट झाली, तेव्हा तिनं मला दारूसाठी विचारलं. पण मी लहान असल्यामुळे नकार दिला. त्यावेळी मला जे काही दिव्यानं सांगितलं, ते मी आता नाही सांगणार. पण, सलमाननं जर मोडता घातला नाही आणि जर माझं पुस्तक छापलं गेलं, तर त्यात मी दिव्या भारतीबद्दल नक्की लिहिणार. दिव्या भारतीचा मृत्यू कशामुळे झाला, हे फक्त मलाच माहित आहे.’ निधी वांसंदनीला मुलाखतीत सोमी अली बोलत होती.
अंडरवर्ल्डबद्दलही आपल्याला दिव्या भारतीनंच सांगितल्याचं सोमी अली म्हणाली. ‘अंडरवर्ल्डकडून रोज फोन यायचे. मी आणि सलमान जेव्हा एकत्र असायचो तेव्हा तर बऱ्याचदा यायचे. एकदा असाच मला फोन आलेला आणि समोरचा माणूस म्हणाला की, ‘भाई कुठे आहे?’ मी त्याला विचारलं, ‘कोण बोलतंय, शिस्तीत बोलायचं’ तो म्हणाला, ‘मी छोटा शकील बोलतोय, मी सोमी अलीला किडनॅप करणार आहे, भाईला सांगा’ असं म्हणून त्याने फोन ठेवला.’ असा किस्साही सोमीनं सांगितला.
दरम्यान, दिव्या भारतीच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं ‘विश्वात्मा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दिव्या यशाच्या शिखरावर असतानाच मुंबईतील वर्सोवा येथील तुळसी अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला. दिव्याच्या निधनानं कलाविश्वाला मोठा धक्का बसला.