IND vs NZ: भुवनेश्वर कुमारसोबत कमबॅकमध्ये घडला धक्कादायक प्रकार, जे घडलं त्यानंतर पुढील सामना खेळणं अवघडच
Bhuvneshwar Kumar Injury: भुवनेश्वर कुमार आज १४३० दिवसांनंतर मैदानावर परतला अन् त्याच्यासोबत मोठा अनर्थ घडला. नेमके काय घडलं ते पाहा..।

Bhuvneshwar Kumar IND vs NZ 1st T20: भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार जवळपास चार वर्षांनंतर न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. गुरुवारी क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व केले. त्याचे पहिले षटक किफायतशीर होते, ज्यात त्याने चार धावा दिल्या. पण भुवीसोबत एक धक्कादायक घटना घडली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. सामन्यादरम्यान, भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमारला फॉलो-थ्रू करताना दुखापत झाली. न्यूझीलंडच्या डावातील १६ व्या षटकात बेवन जेकब्सचा फटका अडवण्याचा प्रयत्न करताना चेंडू त्याच्या मनगटाला लागला. तो वेदनेने विव्हळत होता आणि त्याची तपासणी करण्यासाठी फिजिओला मैदानावर यावे लागले.
ही घटना भुवनेश्वर कुमारच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर घडली. तत्पूर्वी, षटकाच्या पहिल्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सने मिडविकेटच्या दिशेने पुल शॉट खेळून दोन धावा काढल्या आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर, बेवन जेकब्सने बँक्ड लेंथ चेंडूवर लाँग ऑफच्या दिशेने एक शानदार षटकार मारला.
भुवनेश्वर कुमारने १४३० सामन्यानंतर आज कमबॅक केला आहे. भुवीचा कमबॅक हा चाहत्यांसाठी एक सुखद धक्का होता. वेस्ट इंडिजविरुद्ध पाचव्या टी-२० सामन्यात भुवीला संधी मिळाली होती पण पावसामुळे सामना रद्द झाला आणि त्याला खेळता आले नाही. यामुळे चाहत्यांनी दु:ख झाले होते. आता मात्र चाहते खुश झाले कारण त्याला अखेर गोलंदाजी करताना पाहायला मिळाले.
भुवनेश्वर कुमारची दुखापत किती गंभीर आहे याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. तो पुढील सामना खेळले की नाही हे देखील माहित नाही. पण जर त्याची दुखापत गंभीर असेल आणि पुढील सामना मुकावा लागला तर चाहत्यांना सर्वात जास्त दु:ख होईल. भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात भुवीला एकही विकेट काढता आलेली नाही. चार षटकांत त्याने एकूण ४९ धावा केल्या. आता पुढील सामन्यात तरी त्याला विकेट काढता येते की नाही हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
