
मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने नुकताच दहाड सीरिजच्या माध्यमातून डिजिटलमध्ये पदार्पण केले आहे. सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिची सीरिज ही amazon प्राइम व्हिडिओवर रिलीज झाली. विशेष म्हणजे या सीरिजचे जोरदार प्रमोशन करताना सोनाक्षी सिन्हा ही दिसली होती. या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा ही एक पोलिस अधिकाऱ्याच्या (Police officer) भूमिकेत आहे. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हा हिच्या अभिनयाचे काैतुक देखील केले जात आहे. मात्र, सर्वत्र सोनाक्षी सिन्हा हिच्या दहाड सीरिजची चर्चा असतानाच तिची ही सीरिज तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी अजून बघितली नाहीये. याचा खुलासा स्वत: सोनाक्षी सिन्हा हिनेच केला आहे.
नुकताच सोनाक्षी सिन्हा हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये सोनाक्षी सिन्हा हिने सांगितले की, माझ्या दहाड सीरिजची चर्चा होत असतानाच माझ्या वडिलांनीच अजून माझी ही सीरिज पुर्ण बघितली नाहीये. माझे वडील सध्या प्रवासात खूप जास्त व्यस्त असल्याने त्यांना माझी सीरिज बघायला वेळ मिळत नाहीये.
काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी द केरळ स्टोरी चित्रपटाबद्दल मोठे विधान केले होते. शत्रुघ्न सिन्हा हे देखील म्हणाले होते की, मी अजूनही द केरळ स्टोरी हा चित्रपट बघितला नाहीये. कारण मी प्रवासात व्यस्त आहे. इतकेच काय तर मी सोनाक्षीची सीरिज देखील बघितली नाहीये.
शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षीची सीरिज न बघितल्याने आता विविध चर्चांना उधाण फुटल्याचे बघायला मिळत आहे. एकाने म्हटले की, या सीरिजमध्ये सोनाक्षीने इतकी वाईट भूमिका केली आहे की, तिचे वडील देखील तिची ही सीरिज बघू शकत नाहीत. दुसऱ्याने म्हटले की, नक्कीच शत्रुघ्न सिन्हा आणि सोनाक्षी यांच्यामध्ये काहीतरी वाद झाल्याचे दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा ही नेहमीच तिच्या बिनधास्त स्वभावामुळे चर्चेत असते.
काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हा हिचा डबल-एक्सएल हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, सोनाक्षी सिन्हा हिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी सोनाक्षी सिन्हा हिचा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. डबल-एक्सएल चित्रपटात सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत हुमा कुरेशी ही देखील मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हाने 20 किलो वजन वाढवले होते.