AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Double XL | अखेर डबल एक्सएल चित्रपटाचे धमाकेदार टीझर रिलीज, चित्रपट या तारखेला येणार भेटीला…

चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांनी तब्बल 15 ते 20 किलो वजन वाढवल्याचे कळते आहे. हे पात्र चांगल्या पध्दतीने करण्यासाठी सोनाक्षीने खूप जास्त मेहनत घेतलीये.

Double XL | अखेर डबल एक्सएल चित्रपटाचे धमाकेदार टीझर रिलीज, चित्रपट या तारखेला येणार भेटीला...
| Updated on: Sep 22, 2022 | 2:23 PM
Share

मुंबई : आजही आपल्या देशामध्ये बॉडी शेमिंग (Body shaming) केली जाते. एखादी मुलगी जर जाड असेल तर तिला सुंदर म्हटले जात नाही. बॉडी शेमिंग, महिलांचा लठ्ठपणा आणि त्यावरील लोकांचा दृष्टिकोन यावर एक खास चित्रपट (Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा जबरदस्त मनोरंजन (Entertainment) करणार आहे. डबल एक्सएल असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचा खतरनाक असा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आलांय.

इथे पाहा चित्रपटाचा टीझर

 डबल एक्सएल चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज

डबल एक्सएल या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत आहेत. टीझरमध्येच चित्रपट नेमका कशावर आधारित आहे, याची कल्पना चाहत्यांना येते. रिलीज झालेल्या टीझरमध्ये दिसते आहे की, सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी रस्त्याच्याकडेला असलेल्या एका बाकावर बसल्या आहेत. हुमा कुरेशी सोनाक्षीला म्हणते की, दुनिया कुर्तीमधूनही फॅट बघते भाईसाहब…पोट कितीहीमध्ये घ्या पण जीन्स अगोदरच अडकते…यावर सोनाक्षी जोरजोरात हसताना दिसते. त्यानंतर सोनाक्षीही एक खास डाॅयलाॅग बोलते.

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशीने चित्रपटासाठी वाढवले तब्बल इतके किलो वजन

खास डबल एक्सएल चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांनी तब्बल 15 ते 20 किलो वजन वाढवल्याचे कळते आहे. हे पात्र चांगल्या पध्दतीने करण्यासाठी सोनाक्षीने खूप जास्त मेहनत घेतलीये. चित्रपटासाठी वजन वाढवण्यासाठी सोनाक्षी आणि हुमा सारख्या खातच राहत असल्याचे जहीर इकबालने एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. डबल एक्सएल हा चित्रपट सतराम रमानी यांनी डायरेक्ट केला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 14 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.