AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मान्या सिंह ‘बिग बॉस 16’मध्ये स्पर्धेक म्हणून जाण्याची शक्यता, वाचा अजून कोणत्या नावांची सुरू आहे चर्चा…

बिग बॉस 16 च्या घरात नेमके कोणते स्पर्धेक येणार यावर आता चर्चा रंगू लागलीये. चाहते देखील बिग बॉसच्या घरात सहभागी होणाऱ्या स्पर्धेकांची नावे जाणून घेण्यास इच्छुक आहेत.

मान्या सिंह 'बिग बॉस 16'मध्ये स्पर्धेक म्हणून जाण्याची शक्यता, वाचा अजून कोणत्या नावांची सुरू आहे चर्चा...
| Updated on: Sep 22, 2022 | 1:02 PM
Share

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक बिग बॉस 16 ची (Bigg Boss 16) आतुरतेने वाट पाहात आहेत. 1 ऑक्टोबरपासून मनोरंजनाचा (Entertainment) तडका लागणार आहे. बहुचर्चित बिग बॉस 16 चे सीजन आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस या शोने अनेकांना स्वत: ची ओळख निर्माण करण्यासाठी एक संधी दिलीये. इतकेच नाही तर काहीजणांना बिग बॉस शो केल्यानंतर थेट चित्रपटांमध्ये (Movie) काम करण्याची संधी मिळालीये. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शहनाज गिल ही असून शहनाजला खरी ओळख बिग बॉसच्या घरातूनच मिळालीये.

बिग बॉस 16 साठी या नावांची चर्चा सुरू

बिग बॉस 16 च्या घरात नेमके कोणते स्पर्धेक येणार यावर आता चर्चा रंगू लागलीये. चाहते देखील बिग बॉसच्या घरात सहभागी होणाऱ्या स्पर्धेकांची नावे जाणून घेण्यास इच्छुक आहेत. मिस इंडिया 2020 रनरअप मान्या सिंह बिग बॉस 16 च्या घरात येणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहेत. मात्र, अजून बिग बॉस निर्मात्यांनी किंवा मान्याने यासंदर्भात काही भाष्य केले नाहीये. मात्र रिपोर्टनुसार कळते आहे की, मान्या बिग बॉस 16 च्या घरात येण्यास इच्छुक असून तिची निर्मात्यांसोबत चर्चाही सुरू आहे. दिव्यांका त्रिपाठी, कनिका मान, करण पटेल, फैसल खान, जन्नत जुबेर आणि मुनावर फारुकी बिग बॉस 16 मध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

या मोठ्या अभिनेत्रीचा पतीही बिग बॉस 16 च्या घरात दिसू शकतो

बिग बॉस 16 च्या सीजनमधील मजा, भांडणे आणि मारामारी बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मध्यंतरी बातम्या होत्या की, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा देखील बिग बॉस 16 च्या घरात येऊ इच्छित आहे. बिग बॉसच्या निर्मात्यांचे आणि राज कुंद्राचे बोलणे देखील सुरू असल्याचे कळते.  कारण राज कुंद्राला असे वाटते की, बिग बॉसच्या घरातून तो जगाला काही खऱ्या गोष्टी सांगू शकतो. मात्र, अजून हे स्पष्ट झाले नाहीये की, खरोखरच राज कुंद्रा बिग बॉस 16 मध्ये येणार आहे की नाही.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.