सोनाक्षी सिन्हावर कुटुंबाची नाराजी कायम, आई वडिलांच्या घरी नाही लागणार हळद, थेट ‘या’ ठिकाणी…

Sonakshi sinha Marriage : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही कायमच चर्चेत असते. सध्या सोनाक्षी सिन्हा ही तिच्या लग्नामुळे चर्चेत आलीये. सोनाक्षी सिन्हा ही झहीर याच्यासोबत लग्न करत आहे. गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री झहीरला डेट करत होती. सोनाक्षी सिन्हाच्या या निर्णयामुळे तिचे कुटुंबिय नाराज असल्याचे सांगितले जाते.

सोनाक्षी सिन्हावर कुटुंबाची नाराजी कायम, आई वडिलांच्या घरी नाही लागणार हळद, थेट 'या' ठिकाणी...
sonakshi sinha
Follow us
| Updated on: Jun 19, 2024 | 6:21 PM

सोनाक्षी सिन्हा सध्या तूफान चर्चेत असलेले नाव आहे. सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बाल याच्यासोबत 23 जून 2024 रोजी लग्न करतंय. झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करत असल्याने सोनाक्षी सिन्हाचे आई वडील नाराज आहेत. झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. शेवटी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. मुळात म्हणजे झहीर इक्बाल याच्या कुटुंबियांना या लग्नाची काहीच समस्या नाहीये. झहीर इक्बाल आणि सोनाक्षीच्या लग्नाला ते सपोर्ट करत आहेत. मात्र, सोनाक्षी सिन्हाच्या या निर्णयामुळे तिचे कुटुंबिय नाराज आहेत.

सोनाक्षी सिन्हा ही आई वडिलांचे घर सोडून काही दिवसांपूर्वीच बांद्रा येथील तिच्या स्वत:च्या घरात शिफ्ट झालीये. सोनाक्षी सिन्हाचे आई वडील तिच्यावर इतके जास्त नाराज आहेत की, सोनाक्षी सिन्हाला हळद देखील आई वडिलांच्या घरात लागणार नाहीये. बांद्रातील घरातच हळदीचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये सोनाक्षीला हळद लागणार आहे.

कुटुंबातील काही सदस्य आणि मित्रांच्या उपस्थितीमध्ये सोनाक्षी सिन्हाचा हळदीचा कार्यक्रम होईल. आई पूनम सिन्हा, वडील शत्रुघ्न सिन्हा आणि भाऊ लव सिन्हा यांचा या लग्नाला विरोध असल्याचे कळत आहे. हेच नाही तर आई पूनम सिन्हा यांनी सोशल मीडियावरूनही सोनाक्षी सिन्हाला अनफॉलो केले आहे. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या विरोधात आईचा आहे.

यामुळेच सोनाक्षी सिन्हाला आई वडिलांच्या घरी हळद लागणार नाहीये. उद्या (20 जून 2024) सोनाक्षी सिन्हाच्या बांद्रातील घरामध्येच हळदीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या कार्यक्रमांना आता सुरूवात झालीये. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत. शेवटी एका मोठ्या पार्टीचे आयोजन केले जाईल.

सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाच्या प्रत्येक अपडेटवर चाहत्यांच्या नजरा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये मोठा काळ गाजवला आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हाच्या बॅचलरेट पार्टीचे फोटो तूफान व्हायरल होताना दिसले. मात्र, अभिनेत्रीच्या या फोटोंमध्ये घरातील एकही सदस्य दिसला नाही.

Non Stop LIVE Update
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.