AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल बोलली स्वरा भास्कर, थेट म्हणाली, मुले जन्मली की…

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा 23 जून 2024 रोजी झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करत आहेत. सोनाक्षी सिन्हा हिचे कुटुंबिय नाराज असल्याची देखील एक चर्चा बघायला मिळतंय. आता यासर्वांमध्येच अभिनेत्री स्वरा भास्कर हिने मोठे विधान केले आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल बोलली स्वरा भास्कर, थेट म्हणाली, मुले जन्मली की...
Sonakshi Sinha and Swara Bhaskar
| Updated on: Jun 20, 2024 | 11:50 AM
Share

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. यावेळी सोनाक्षी सिन्हा ही तिच्या चित्रपटांमुळे नव्हे तर चक्क खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा गेल्या काही वर्षांपासून झहीर इक्बाल याला डेट करतंय. आता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय सोनाक्षी सिन्हाने घेतलाय. 23 जून 2024 रोजी सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न आहे. मात्र, एक चर्चा रंगताना दिसतंय की, सोनाक्षी सिन्हा हिचा हा निर्णय तिच्या कुटुंबियांना अजिबातच मान्य नाहीये. यामुळे सिन्हा कुटुंबात वाद निर्माण झालाय.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न 23 जूनला असतानाच सोनाक्षी झहीरच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवताना दिसली. ज्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करणार असल्याचे समजल्यापासून तिच्यावर जोरदार टीका ही होताना दिसत आहे. अनेकांनी सोनाक्षी सिन्हाला खडसावले आहे.

आता सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाची चर्चा असतानाच अभिनेत्री स्वरा भास्कर हिने मोठे भाष्य केले आहे. एकप्रकारे सोनाक्षी सिन्हा हिला सपोर्ट करतानाच स्वरा भास्कर ही दिसत आहे. स्वरा भास्कर हिने मुलाखतीमध्ये म्हटले की, आधुनिक भारतामध्ये सर्वात मोठी एक धारणा आहे ती म्हणजे ‘लव्ह जिहाद’…एका हिंदू मुलीने आणि मुस्लिम मुलाने लग्न केले की…

मुळात म्हणजे हे मलाही लागू होते. हेच नाही तर आपल्याकडे काही शहरांमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आंतरधर्मीय जोडप्याला मारहाण केली जाऊ शकते. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर यांच्या नात्याबद्दल बोलताना स्वरा भास्कर म्हणाली की, माझ्या लग्नाच्या वेळीही अनेकांनी त्यांचे मत मांडले होते. मला अनेक सल्ले देण्यात आली होती.

ते वैयक्तिक आयुष्यात काय करतात, ते लग्न करतात की नाही हे त्यांच्यावर अवलंबून असते. ते एकत्र राहत असतील, कोर्टात लग्न करत असतील किंवा निकाह करत असतील किंवा आर्य समाजात लग्न करत असतील तर त्याचा कोणाशीही संबंध नाही. भारत आणि दक्षिण आशियाईमध्ये लोकांना दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये ढवळाढवळ करण्यास आवडते.

हे तर काहीच नाही थांबा…ज्यावेळी त्यांना (सोनाक्षी आणि झहीर) मुले जन्माला येतील, त्यावेळी मुलाच्या नावाबद्दलही एक वेगळीच चर्चा होताना दिसेल. माझ्या बाळाच्या जन्मानंतर हे बघायला मिळाले. हेच नाही तर करीना कपूर आणि सैफच्या मुलांबद्दलही हे बघायला मिळाले. मुळात म्हणजे हे सर्व मुर्खपणाचे आहे. मात्र, हे इतक्या लवकर संपणार नाही हे देखील नक्की आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा