Sonakshi Sinha | सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत जंगलामध्ये घडली दुर्घटना, अभिनेत्रीने थेट

बाॅलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हा हिचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, सोनाक्षी सिन्हा हिच्या या चित्रपटाला काही खास धमाला करण्यात यश मिळाले नाही. आता अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांची जोडी परत एकदा धमाल करताना दिसणार आहे.

Sonakshi Sinha | सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत जंगलामध्ये घडली दुर्घटना, अभिनेत्रीने थेट
| Updated on: Jul 06, 2023 | 2:31 PM

मुंबई : बाॅलिवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही नेहमीच चर्चेत असते. सोनाक्षी सिन्हा हिचा काही दिवसांपूर्वीच डबल एक्सएल हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत हुमा कुरेशी ही देखील मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट वजन वाढलेल्या मुलींवर आधारित होता. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सोनाक्षी सिन्हा ही दिसली होती. मात्र, या चित्रपटाला (Movie) काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हा हिने या चित्रपटासाठी तब्बल 20 किलो वजन वाढवले होते. यादरम्यान फक्त सोनाक्षी सिन्हा हिच नाही तर कतरिना कैफ आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांचे देखील चित्रपट फ्लाॅप गेले होते.

सोनाक्षी सिन्हा ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोनाक्षी सिन्हा ही नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हा हिची वेब सीरिज रिलीज झाली होती. विशेष म्हणजे वेब सीरिजमधील अभिनयासाठी सोनाक्षी सिन्हा हिचे काैतुकही अनेकांनी केले.

नुकताच सोनाक्षी सिन्हा हिने एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना सुरूवातीला मोठा धक्का बसला. सोनाक्षी सिन्हा हिने शेअर केलेला हा व्हिडीओ जंगलामधील आहे. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी सिन्हा हिला दुखापत झाल्याचे देखील सुरूवातीला दिसत आहे.

झिप लाइन करत असताना सोनाक्षी सिन्हा हिच्या बॅकला मार लागल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र, पुढे धमाल करताना सोनाक्षी सिन्हा ही दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत सोनाक्षी सिन्हा हिचे काैतुक केले आहे.

सोनाक्षी सिन्हा ही सध्या विदेशात सुट्ट्या घालवताना दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा ही जंगलामध्ये धमाल करत आहे. सोनाक्षी सिन्हा हिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ही ही ही थोडेसे लागले स्पायडर गर्ल…सोनाक्षी सिन्हा ही नेहमीच तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. सोनाक्षी सिन्हा तिच्या वेब सीरिजचे प्रमोशन करताना देखील दिसली होती.

सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय कुमार हे परत एकदा एकसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. यापूर्वी अक्षय आणि सोनाक्षी यांनी एकत्र काम केले आहे. परत एकदा या जोडीला सोबत पाहण्यास चाहते इच्छुक आणि आतुर आहेत. रिपोर्टनुसार अक्षय कुमार याच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटामध्ये सोनाक्षी सिन्हा ही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.