
सोनम कपूरचा हा अनोखा लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सोनमच्या या फोटोंवर चाहत्यांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

सोनम कपूरचा हा फेदरी ड्रेस पाहून एका चाहत्यानं कमेंट बॉक्समध्ये लिहिलं- कोंबडी बनणं आवश्यक होतं... दुसर्यानं लिहिलं – घालवले ना मेकअपवर पैसे वाया…

सोनम कपूरचे हे फोटो 2 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहेत आणि शेअर केले आहेत. सोनम कपूर यापूर्वी तिच्या आउटफिटसाठी बर्याच वेळा ट्रोल झाली होती.

शिवाय तिला बॉलिवूडची फॅशन आयकॉनसुद्धा म्हटलं जातं. सोनम कपूर नेहमी नवीन आउटफिटमध्ये तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. सोनम कपूर ही बॉलिवूडची सर्वात फॅशनेबल आणि शॉपिंग करणारी अभिनेत्री मानली जाते.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सोनम कपूर 2019 मध्ये 'द जोया फॅक्टर' आणि 'एक लडकी को देख तो ऐसा लगा' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती.