रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं माझ्या छातीला स्पर्श केला, अंधाऱ्या जागेचा फायदा…प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक अनुभव

Sonarika Bhadoria : टीव्ही अभिनेत्री सोनारिका भदोरियानं नुकत्याच एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं माझ्या छातीला स्पर्श केला, अंधाऱ्या जागेचा फायदा...प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक अनुभव
| Updated on: Nov 01, 2026 | 3:14 PM

मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सोनारिका भदौरिया हिनं बालपणीच्या एका कटू अनुभवाबद्दल खुलासा केला होता. वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी तिला एका धक्कादायक प्रसंगाला सामोरं जावं लागलं. एका रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा अनुभव तिनं सांगितला.

नेमकं काय घडलं होतं?

Loading...

सोनारिका भदौरिया हिनं आपल्या बालपणीच्या या अनुभवाबद्दल सांगताना त्या प्रसंगाचा तिच्यावर झालेला परिणाम अधोरेखित केला. ‘हॉटरफ्लाय‘ला दिलेल्या मुलाखतीत सोनारिका म्हणाली की ‘आयुष्यात एकदा अशी घटना घडली होती ज्यामुळे मी खूप निराश झाले होते. मी १०-११ वर्षांची होते. मी माझ्या एका मानलेल्या भावाला राखी बांधायला गेले होते. तिथे एक रेस्टॉरंट होतं. राखी बांधल्यानंतर माझे आईवडील म्हणाले की चला, इथेच लंच करूया. मी, आईवडील आणि माझा भाऊ त्या रेस्टॉरंटमध्ये गेलो.’

‘रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताना एका दरवाजातून ५ पावलं चालत दुसऱ्या दरवाजाकडे जायचं होतं. पण ते ५ पावलं चालत असताना तिथे पूर्ण अंधार होता. त्या क्षणी रेस्टॉरंटचा एक मॅनेजर माझ्यासोबतच चालत होता. चालता चालता त्या अंधाऱ्या जागेचा फायदा घेत त्यानं माझ्या छातीला स्पर्श केला. माझ्यासोबत काय घडलं, हे मला तेव्हा सुधारलंच नाही. मी नंतर एकदम शांत झाले. जेव्हा मी १५-१६ वर्षांची झाले तेव्हा मला पुन्हा ती घटना आठवत त्याची जाणीव झाली. मी त्याबद्दल आईला सांगितलं. आईने मला ‘तेव्हाच का सांगितलं नाहीस?’ असं विचारलं. पण तेव्हा मला काहीच कळलं नव्हतं. मी सुन्न झाले होते. माझ्या वडिलांना तर अजूनही याबद्दल माहित नाहीये. जर त्यांना कळलं तर ते त्या माणसाला जिथे कुठे असतील तिथून शोधून किंवा तो मेला जरी असेल तरी त्याची कबर खोदून त्याला मारुन येतील.’ असं सोनारिका शेवटी म्हणाली.

कोण आहे सोनारिका भदौरिया?

सोनारिका भदौरिया ही हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पौराणिक मालिकांमधील भूमिकांमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. ‘देवों के देव… महादेव’ या मालिकेत तिने साकारलेली पार्वतीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us