Thane: ठाण्यात पहिल्यांदाच सोनू निगमचा लाईव्ह कॉन्सर्ट

| Updated on: Apr 28, 2022 | 11:26 AM

या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रख्यात गायक सोनू निगम (Sonu Nigam) हा प्रथमच ठाण्यात आपल्या कलेचे प्रदर्शन करणार आहे. कोरोनामुळे सर्वच नागरिक बेजार झाले होते. सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंधांमुळे नागरिकांना जल्लोष साजरा करणे शक्य होत नव्हते.

Thane: ठाण्यात पहिल्यांदाच सोनू निगमचा लाईव्ह कॉन्सर्ट
Sonu Nigam
Image Credit source: Facebook
Follow us on

गेले दोन वर्षे कोरोनामुळे घरातच बंदीस्त झालेल्या ठाणेकरांना शनिवारी जल्लोष करण्याची संधी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) प्रणित ‘संघर्ष’ या संस्थेमुळे मिळणार आहे. खारीगाव येथील 90 फूट रोडवर ‘सोनू निगम लाईव्ह 2022’ (Sonu Nigam) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रख्यात गायक सोनू निगम हा प्रथमच ठाण्यात आपल्या कलेचे प्रदर्शन करणार आहे. कोरोनामुळे सर्वच नागरिक बेजार झाले होते. सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंधांमुळे नागरिकांना जल्लोष साजरा करणे शक्य होत नव्हते. आता कोरोनाचे संकट टळले आहे आणि राज्य सरकारने देखील सार्वजनिक ठिकाणी पाळावयाचे निर्बंध उठवले आहेत. त्यामुळेच ‘संघर्ष’च्या वतीने सोनू निगम लाईव्ह 2022 (Live Concert) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शनिवार, दि. 30 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 6.30 ते 10 या वेळात 90 फूट रोड, खारीगाव येथे हा कार्यक्रम होणार आहे. सोनू निगम या सुप्रसिद्ध गायकाचा लाईव्ह परफॉर्मन्ससह विविध कलांचा अविष्कार आपणाला येथे अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमास मोफत प्रवेश आहे.

दरम्यान, सोनू निगम प्रथमच ठाण्यात शो करत असल्याने या कार्यक्रमाबद्दल उत्सुकताही ताणली गेली आहे. या कार्यक्रमास ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोष साजरा करावा, असे आवाहन संघर्षच्या वतीने करण्यात आले आहे. नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन सोनू निगमचा सन्मान करण्यात आला. हा पद्मश्री पुरस्कार आपण आपल्या आईला सपर्पित करत असल्याचं सोनूने म्हटलं होतं.

इन्स्टा पोस्ट-

सोन निगमने बॉलिवूडला एकापेक्षा एक गाणी दिली. त्याची गाणी आणि त्याचा आवाज भारतीयांच्या मनात घर करून आहे. त्याने हिंदीशिवाय इतर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 2003 साली सोनू निगमला ‘कल हो ना हो’ या चित्रपटाच्या शीर्षकासाठी राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सोनू निगमने आमिर खानच्या पीके चित्रपटातील ‘भगवान है कहाँ से तू’ हे गाणं गायलं होतं, तर दुसरीकडे अग्निपथ चित्रपटातील ‘अभी मुझे मैं कही’ हे गाणंही चाहत्यांना आजही भावतं. याशिवाय ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘सूरज हुआ मद्दम’ हे गाणे आजही तितक्याच आवडीने ऐकलं जातं.