Indian Idol 12 : ‘इंडियन आयडॉल’चा वाद मिटवण्यासाठी सोनू निगमचा पुढाकार, व्हिडीओद्वारे केलं ‘हे’ आवाहन

| Updated on: Jun 02, 2021 | 6:35 PM

अमित कुमार यांच्या शांततेचा फायदा उचलला जातोय, असं म्हणत सोनू निगमनं एक व्हिडीओ शेअर केला. (Sonu Nigam's initiative to end 'Indian Idol' controversy)

Indian Idol 12 : इंडियन आयडॉलचा वाद मिटवण्यासाठी सोनू निगमचा पुढाकार, व्हिडीओद्वारे केलं हे आवाहन
Follow us on

मुंबई : गेले अनेक दिवस इंडियन आयडॉल 12 (Indian Idol 12) वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे.  या वादात आतापर्यंत अनेक स्टार्सनी आपलं मत मांडलं आहे. इंडियन आयडल 12 च्या किशोर कुमार विशेष भागात त्यांचा मुलगा अमित कुमार यांनी खुलासा केला की त्यांना स्पर्धकांचं कौतुक करण्यास सांगितलं गेलं त्यानंतर लोकांनी शोवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती. आता सोनू निगमनं या वादावर वक्तव्य केलं आहे.

वाद मिटवण्यासाठी सोनू निगमनं  शेअर केला व्हिडीओ

काहींनी अमित कुमारवर भाष्य केलं तर काहींनी या शोबद्दल सांगितलं. आता गायक सोनू निगम हा वाद मिटवण्याच्या आशेनं समोर आला आहे. अमित कुमार यांच्या शांततेचा फायदा उचलला जातोय, असं म्हणत सोनूनं एक व्हिडीओ शेअर केला.

पाहा व्हिडीओ (See Video)

सोनू म्हणाला- ‘मी या वादाबद्दल गेले अनेक दिवसांपासून वाचत आहे मात्र मी गप्प आहे, आता हे माझ्या सहनशीलतेच्या पलीकडे जात आहे. जेव्हा अमित कुमार जी इंडियन आयडॉलमध्ये आले, तेव्हा लोकांनी त्यांना पाहिलं आणि बरेच लोक म्हणाले की स्पर्धक किशोर कुमार प्रमाणे गायले नाहीत. सर्व प्रथम हे तुमचं मत आहे आणि ते ठीक नाही प्रत्येकजण किशोर कुमार होऊ शकतो आणि प्रत्येकजण त्याच्या गाण्यांना न्याय देऊ शकतो असं नाही. आता अमित कुमार जी आले. ते एक अतिशय मोठे व्यक्ती आहेत. महत्त्वाचं म्हणजे ते आमचे उस्ताद किशोर कुमार यांचा मुलगा आहे आणि त्यांनी आमच्यापेक्षा जास्त या इंडस्ट्रीला पाहिलं आहे. आमच्यापेक्षा जास्त जग पाहिले आहे. एक सरळ आणि सभ्य माणूस ते आहेत, ते जास्त बोलत नाहीत.

सोनू पुढे म्हणाला, ‘मी विनंती करतो की आता हा वाद संपवावा.. त्यांनी कधीही असं म्हटलं नाही की निर्मात्यांनी त्यांनी कौतुक करायला भाग पाडलं. ही इंडियन आयडॉलची चूक नाही, त्यांनी फक्त आपल्या प्रतिस्पर्ध्यांना प्रोत्साहित करण्यास सांगितलं आणि अमित कुमार जी यांनीही काही चूक म्हटले नाही. ते म्हणाले की मला स्पर्धकांचं कौतुक करायला सांगितलं गेलं होतं,  मग मी त्यांचे फक्त कौतुक केलं.’

तर यामध्ये अमित जींनी इंडियन आयडॉलबद्दल काहीही वाईट म्हटलं नाही… यात अमित जीचा किंवा इंडियन आयडॉलचा दोष नाही. जे लोक मध्यभागी येऊन त्याला महत्त्व देत आहेत त्यांचा दोष आहे असं सोनू निगमनं आपल्या या व्हिडीओमध्ये म्हटलं.

संबंधित बातम्याा

Photo: ‘धकधक गर्ल’च्या स्मित हास्याने वाढवली हृदयाची धडधड, माधुरीच्या ‘या’ अदांवर चाहते क्लीन बोल्ड

Samantha Akkineni : ‘द फॅमिली मॅन’मधील सामंथा अक्किनेनीचा दमदार अभिनय पाहण्याआधी जाणून घ्या ‘या’ गोष्टी!