Sridevi: श्रीदेवीच्या मृत्यूचा तमाशा, दुबईतील सरकारी वकिलांवर दबाव अन्… घटनेच्या 8 वर्षांनंतर मोठा खुलासा करणारी ‘ती’ व्यक्ती कोण?

Sridevi: बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी यांचा अपघात झाला की, त्या रात्री काही मोठं घडलं... यावर आजही चर्चा होत असते. आता 'त्या' रात्री नेमकं काय झालं? आणि बोनी कपूर यांची अवस्था काय झालेली... यावर एक महत्त्वाच्या व्यक्तीने मोठा खुलासा केला आहे.

Sridevi: श्रीदेवीच्या मृत्यूचा तमाशा, दुबईतील सरकारी वकिलांवर दबाव अन्... घटनेच्या 8 वर्षांनंतर मोठा खुलासा करणारी ती व्यक्ती कोण?
Sridevi
| Updated on: Nov 27, 2026 | 8:57 AM

Sridevi: बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर फक्त त्यांच्या कुटुंबियांनाच नाही तर, चाहत्यांना आणि बॉलिवूडला देखील मोठा धक्का बसला. श्रीदेवी यांच्या निधनाची ‘ती’ भयानक रात्र आजही कोणी विसरु शकत आहे. श्रीदेवी यांनी फेब्रुवारी 2018 रोजी अखेरचा श्वास घेतला. तेव्हा श्रीदेवी आणि पती बोनी कपूर कुटुंबातील सदस्याच्या लग्नासाठी दुबईत गेलेले. तेव्हा रात्री हॉटेलच्या खोलीतील बाथटबमध्ये श्रीदेवी पडल्या आणि त्यांचं निधन झालं. यानंतर अनेक चर्चा सुरु झालेल्या यावर आता भरातीय राजदूत नवदीप सिंग सूरी यांनी मोठा खुलासा केला. तेव्हा कपूर कुटुंबियांची त्यांनी मदत केली.

नवदीप सिंग सूरी यांनी स्पष्ट केलं की, श्रीदेवी यांच्या शेवटच्या क्षणांदरम्यान कोणतीत गडबड झाली नाही आणि तसे कोणते ठोस पुरावे देखील समोर आलं नाही. सांगायचं झालं तर, त्या वेळी सुरी हे यूएईमध्ये भारताचे राजदूत होते आणि त्यांनी पार्थिव शरीर परत आणण्याच्या प्रक्रियेदरम्यान दुबईतील अधिकारी आणि श्रीदेवी यांच्या कुटुंबामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुरी यांनी सांगितलं की, जेव्हा त्यांना याबद्दल समजलं तेव्हा त्यांनी तात्काळ स्वतःचं वेळापत्रक बदललं, कारण या परिस्थितीत त्यांची गरज भासेल असे त्यांना वाटलं,

Loading...

सुरी म्हणाले, “मला असं वाटत होतं की, यामध्ये एक मोठी घडामोड घडेल, त्यामुळे माझा एक कार्यक्रम होता, तिथे जाणे मी पुढे ढकललं.” त्यानंतर त्यांनी श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर आणि कुटुंबातील इतर सदस्यांना फोन केला. त्यावेळी सर्वांनाच मोठा धक्का बसलेला. भारतात पार्थिव कसं घेवून जाणार हाच प्रश्न सर्वांसमोर होता…

सुरी म्हणाले, ‘तेव्हा त्याठिकाणी सगळे बसले होते. सर्वांना मोठा धक्का बसलेला. काही महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पार्थिव भारतात घेवून जाता येईल असं मला वाटलेलं. मृत्यूच्या परिसि्थतीमध्ये काहीही संशयास्पद नव्हतं. एवढंच नाही तर, बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेकांनी जेट पाठवण्याची देखील व्यवस्था केलेली. पण माध्यमांनी घटनेचा तमाशा बनवून ठेवलेला. ज्यामुळे तपास झालाच पाहिजे, यासाठी दुबईतील सरकारी वकिलांवर दबाव आलेला.’, असं देखील सुरी म्हणाले. रिपोर्टनुसार, मृत्यूच्या जवळपास तीन दिवसांनंतर श्रीदेवी यांचं पार्थिव मुंबईत आलं आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us