AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना 5 हजार दिले म्हणजे उपकार केले नाही, आम्हाला भीक…, भाजपचा हा नेता प्रचंड संतापला, पक्षाला घरचा आहेर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना मदत म्हणून दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपये दिले.  मात्र आता सरकारच्या या तुटपुंज्या मदतीवरून भाजप नेत्यानेच संताप व्यक्त केला आहे. सरकारला घरचा आहे दिला आहे.

शेतकऱ्यांना 5 हजार दिले म्हणजे उपकार केले नाही, आम्हाला भीक..., भाजपचा हा नेता प्रचंड संतापला, पक्षाला घरचा आहेर
Vinod BanteImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 27, 2026 | 8:52 AM
Share

राज्यात यंदा दुष्काळ पडला आहे, ऐल निनोच्या प्रभावामुळे पुरेसा पाऊस न झाल्याने खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पीकं तर हातातून गेलीच आहेत, परंतु पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत. दिवाळीपूर्वी सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची आग्रीम मदत केली होती.  मात्र यावरून आता भाजप नेत्यानेच संताप व्यक्त करत सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकारने शेतकऱ्यांना पाच हजार रुपये दिले म्हणजे काय उपकार केले नाहीत, सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असं भाजप नेत्याने म्हटलं आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना मदत म्हणून दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपये दिले.  मात्र आता सरकारच्या या तुटपुंज्या मदतीवरून भाजप नेत्यानेच संताप व्यक्त केला आहे. सरकारला घरचा आहे दिला आहे. भंडारा जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते विनोद बांते यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सरकारने शेतकऱ्यांना पाच हजार रुपये दिले मात्र त्यांनी काय उपकार केला नाहीत, सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप यावेळी बांते यांनी केला आहे. दरम्यान आम्हाला भीक नको,  आमच्या धानाला बोनस द्या, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.  सरकारच्या काही निर्णयामुळे गावातील नाले, रस्त्यांची कामे, इतर विकास कामे प्रभावित झाले असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामांवर मर्यादा घालण्यात आली आहे. तर,  दुसरीकडे आमदार आणि खासदारांना मात्र सरकारनं रान मोकळं करून दिलं आहे, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली. भंडारा जिल्ह्यातील बेलगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात विनोद बांते बोलत होते. त्यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला