
Sunil Grover Comedy Moments Viral : कॉमेडियन सुनील ग्रोव्हर (Sunil Grover ) याच्या अभिनयाचे सगळेच फॅन आहे. नेटफ्लिक्स वरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये तो वेगवेगळ्या स्टार्सच्या भूमिकेत (त्यांची नक्कल) करताना दिसतो, पण त्याचं काम इतक हुबेहूब असतं की तो कलाकार खरा की सुनीलची ॲक्टिंग सरस असा प्रश्च लोकांना पडवा. त्याची मिमिक्री, स्टाईल आणि कॉमिक टायमिंग यामुळे लोक पोट धरून नुसते हसत असतात. नुकत्याच आलेल्या एका एपिसोडमध्ये तर तो चक्क मि. परफेक्शनिस्ट, म्हणजेच अभिनेता आमिर खान बनून शोमध्ये आला होता. त्याचे फक्त आमिरचे कपडे आणि हेअरस्टाइल कॉपी केली नाहील तर त्याचे हावभाव, बोलणं, चालणं, मॅनरिझम्स सगळ्याची हूबेहूब नक्कल सुनीलच्या परफॉर्मन्समध्ये दिसत होती.
खरंतर नुकत्याच आलेल्या एपिसोडमध्ये कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे हे गेस्ट म्हणून आले होते, ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त त्यांनी कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली होती. त्याच एपिसोडमध्ये सुनील ग्रोव्हरने आमिर खान बनून एंट्री केली आणि त्याचा ह्यूमर, खोडकर अंदाज आणि शानदार पोझे देण्याची स्टाईल पाहून लोकांना आमिरच आठवला. टाळ्याच्या गजरात लोकांनी त्याचं कौतुक केलं.
व्हायरल व्हिडीओ, फोटोग्राफर्सवर मजेदार कमेंट
याच दरम्यान, या एपिसोडमधील एक व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आमिर खान बनलेला सुनील ग्रोव्हर स्टेजवर पापाराझींसाठी पोज देताना दिसत आहे.तेव्हा त्याने छायाचित्रकारांचे कौतुक केले आणि हसत म्हणाला, “तुम्ही चांगले कपडे घातले आहेत. आज तुमची पँटही छान आहे.” त्याची ही मजेशीर, खोचक कमेंट ऐकून लोकंही हसायला लागले आणि व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला. सुनीलच्या या कमेंटचा संदर्भ लोकं आता जया बच्चन यांनी केलेल्या विधानाशी जोडत आहेत.
अभिनेत्री जया बच्चन या पापाराझींशी नेहमीच कठोर वागतात आणि त्यांच्या वागण्याची अनेकदा चर्चा होते. सुनील ग्रोव्हरची मिमिक्री आणि पापाराझींशी बोलताना त्याने केलेली टिप्पणी यांचा जया बच्चन यांच्या विधानाशी संबंध जोडला जाता आहे. पापाराझी जेव्हा सेलिब्रिटींचे फोटो काढतात,तेव्हा ते जसे वागतात, तसेच ते जे कपडे घालतात याबद्दल एका मुलाखतीत जया बच्चन यांनी रोष व्यक्त करत त्यांच्यावर, कपड्यांवर टीका केली होती. त्यावरून बराच वादही झाला होता. आता सुनील ग्रोव्हरने आमिरच्या भूमिकेत असताना पापाराझीची मजा घेत जे विधान केलं त्यामुळे जया बच्चन पुन्हा चर्चेत आल्या आहेत.