AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांचा अपघात की घातपात? अवघ्या काही तासात मोठा खुलासा होणार; आज संध्याकाळीच DGCA…

अजित पवार विमान अपघात प्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली. आता या डीजीसीए अहवाल सादर करणार आहे.

अजितदादांचा अपघात की घातपात? अवघ्या काही तासात मोठा खुलासा होणार; आज संध्याकाळीच DGCA...
अजित पवार विमान अपघातImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 28, 2026 | 3:16 PM
Share

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. मुंबईहून बारामतीला जात असतान त्यांच्या विमानाचा अपघात झाला. बारामती विमानतळाजवळ हा अपघात घडला. या घटमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली. अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित करत हा अपघात आहे की घात आहे? असा प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

संध्याकाळी सादर होणार अहवाल

आज संध्याकाळी DGCAचा प्राथमिक अहवाल येणार आहे. हा अहवाल DGCA त्यांच्या अधिकृत वेब साइटवर प्रकाशित करणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. या अहवालात नेमकं काय असणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एएआयबीने जो एक महिनाभर तपास केला त्यावरती हा अहवाल असणार आहे. प्राथमिक अहवालातील मुद्द्यांवर अंतिम अहवाल प्रकाशित केला जाणार आहे. आज संध्याकाळी हा संपूर्ण अहवाल प्रकाशित होणार आहे. या अहवालात आतापर्यंत या प्रकरणाचा तपास कसा करण्यात आला याची सविस्तर माहिती असणार आहे.

आज नेमकी कोणती माहिती समोर येणार?

एएआयबी ही जी DGCAची एजंसी आहे ती संपूर्ण एक महिना अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचा तपास करत आहे. या तपासाच्या आधारे प्राथमिक अहवाल संध्याकाळपर्यंत सादर करण्यात येणार आहे. या अहवालात महिना भराच्या तपासातील प्राथमिक मुद्दे असणार आहेत. या अहवालात हा अपघात कसा झाला? यामध्ये दोषी कोण आहे? याबाबत प्राथमिक माहिती पाहायला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विमान अपघातानंतर जे व्हीसीआर सापडलं होतं. ते अमेरिकेच्या कंपनीने बनवले होते. तो व्हीसीआर अमेरिकेत पाठवायचा की अमेरिकेतील प्रतिनिधी भारतात बोलवायचे याबाबतही माहिती समोर येईल.

DGCA आणि AAIB कडून तपास सुरू

केंद्र सरकारने अजित पवारांच्या या अपघाताची गंभीर दखल घेतली होती. DGCA आणि AAIB कडून सखोल चौकशी सुरू होती. ब्लॅक बॉक्स, फ्लाइट डेटा आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर चालू होते. कंपनीने तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. आज DGCAचा अहवाल आल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...