AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ ‘ही’ 4 रोपं लावल्याने एका रात्रीत बदलेल तुमचं नशीब

वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ काही शुभ रोपं लावल्याने आनंद आणि समृद्धी येते. ही रोपं लावल्याने घरातील व आसपासची नकारात्मक ऊर्जा दूर होतात आणि सकारात्मकता आणते. चला कोणती 4 झाडे लावावी ते जाणून घेऊयात.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ 'ही' 4 रोपं लावल्याने एका रात्रीत बदलेल तुमचं नशीब
auspicious plantsImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Feb 28, 2026 | 3:23 PM
Share

वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य प्रवेशद्वाराशी संबंधित अनेक विशेष नियमांचे वर्णन केले आहे, ज्यांचे पालन केल्याने घरात सुख-शांती येते आणि धनाची देवी लक्ष्मी मातेचं आगमन होते.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही विशिष्ट रोपं लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि सकारात्मक उर्जेचे आगमन होते. तुम्हालाही जर आनंद आणि समृद्धी वाढवायची असेल, तर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नक्कीच ही शुभ रोपं लावा. आजच्या लेखात कोणती 4 रोपं लावयची ते जाणून घेऊयात.

तुळस

धार्मिक श्रद्धेनुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ तुळशीचे रोपं लावल्याने आर्थिक परिस्थिती मजबूत होते आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे घरात लक्ष्मी मातेचं आगमन देखील होते. तसेच तुळशीचे रोपं उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेने लावणे शुभ मानले जाते. रोपाभोवती स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या, कारण लक्ष्मी मातेला स्वच्छ भाग आवडते.

शमीचे रोपं

याव्यतिरिक्त तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शमीचे झाड लावणे शुभ मानले जाते. हे झाड शनिदेव आणि भगवान शिव यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. मुख्य प्रवेशद्वारावर हे झाड लावा आणि त्याची दररोज पूजा करा. वास्तुनुसार हा उपाय तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करेल आणि तुमच्या घरात शांती आणि आनंद आणेल.

मनी प्लांट

वास्तुनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मनी प्लांट लावल्याने आर्थिक अडचणी कमी होतात आणि आर्थिक लाभ मिळतो. हे रोप आग्नेय दिशेला लावावे. त्यामुळे मानसिक ताण कमी होण्यासही मदत होते.

जेड प्लांट

याव्यतिरिक्त घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जेड प्लांट ठेवणे शुभ मानले जाते. मुख्य प्रवेशद्वारावर ते ठेवल्याने संपत्ती, आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. जेड वनस्पती घराच्या आग्नेय दिशेने ठेवावी.

या गोष्टी लक्षात ठेवा

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावलेल्या रोपांभोवती स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.

जर काही कारणास्तव रोपांची पानं सुकली असतील तर ती काढून टाका.

दररोज रोपांना पाणी द्या.

झाडांजवळ काटेरी झाडे लावू नयेत.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप