
मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : अभिनेते सनी देओल यांची पत्नी पूजा देओल कायम लाईमलाईटपासून दूर असते. सनी देओल यांनी एका मुलाखतीत यामागचं कारण देखील सांगितलं होतं. सांगायचं झालं तर, पूजा देओल कायम माध्यमांपासून दूर राहतात. सोशल मीडियावर देखील त्या सक्रिय नसतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा देओल यांचं सोशल मीडियावर अकाउंट देखील नाही. पूजा देओल यांच्या प्रमाणे अभिनेते धर्मेंद्र यांची पत्ना प्रकाश कौर आणि अभिनेता बॉबी देओल याची पत्नी तान्य देओल देखील माध्यम आणि लाईमलाईटपासून दूर असतात. सध्या सर्वत्र देओल कुटुंबाची चर्चा सुरु आहे.
पत्नी पूजा देओल यांच्याबद्दल सनी देओल म्हणाले, ‘पूजा हिला लाईमलाईटपासून दूर राहण्यासाठी जबरदस्ती करण्यात आलेली नाही.’ मुलाखतीत सनी देओल यांना, ‘प्रकाश कौर, पूजा देओल आणि तान्या देओल यांच्यावर घरातील पुरुषांकडून लाईमलाईटपासून दूर राहण्याचा दबाव आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता.
विचारण्या आलेल्या प्रश्नावर सनी देओल म्हणाले, ‘हे सत्य नाही. माझ्या आईवर किंवा पत्नीवर लाईमलाईटपासून दूर राहण्यासाठी कोणताही दबाव नाही. माझी पत्नी तिचे स्वतःचे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र्य आहे. लाईमलाईटपासून दूर राहण्याचा तिचा स्वतःचा निर्णय आहे.’ असं देखील सनी देओल म्हणाले.
पुढे सनी देओल म्हणाले, ‘माझ्या वडिलांनी किंवा मी घरातील महिलांवर कोणताही दबाव टाकला नाही. आम्ही सांगितलेल्या नियमांचं पालन केलं पाहिजे… असा कोणताही दबाव त्यांच्यावर नाही… ‘ एवढंच नाही तर सनी देओल यांनी त्यांच्या स्वभावाबद्दल देखील सांगितलं होतं. ‘मी सिनेमांमध्ये आक्रमक दिसतो, पण खऱ्या आयुष्यात मी खूप कूल आहे…’
पुढे सनी देओल म्हणाले, ‘मी खऱ्या आयुष्यात प्रचंड कूल आहे. पण कधी-कधी मला राग येतो आणि तो नियंत्रणाबाहेर जातो..’ सध्या सर्वत्र सनी देओल आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सर्वत्र चर्चा रंगत आहे. नुकताच सनी देओल ‘गदर २’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले.
‘गदर २’ सिनेमा यंदाच्या वर्षातील बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा सिनेमा ठरला आहे. ‘गदर २’ सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. सिनेमाने फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘गदर २’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित झाला आहे.